पाकिस्तानने चक्क कोरोना प्रतिबंधक लस आणली आहे मात्र त्यासाठी चाचण्या केल्या की नाही हे सांगितले नाही, डाटाही दिला नाही. तरीही पाकवॅक नावाने ही लस बाजारात आणली आहे. कोरोना विषाणूवर ही लस किती परिणामकारक आहे, हे देखील सांगण्यात आलेले नाही.No test , no data provided, but Pakistan brings corona preventive Pakvac vaccine
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानने चक्क कोरोना प्रतिबंधक लस आणली आहे मात्र त्यासाठी चाचण्या केल्या की नाही हे सांगितले नाही, डाटाही दिला नाही. तरीही पाकवॅक नावाने ही लस बाजारात आणली आहे.
कोरोना विषाणूवर ही लस किती परिणामकारक आहे, हे देखील सांगण्यात आलेले नाही.भारताने स्वदेशी कोरोना लस विकसित केल्यापासूनच पाकिस्तानची पोटदुखी सुरू होती.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये बनविलेली लस बाजारात आणायचीच असे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे पाकिस्तानने ही लस बाजारात आणली आहे.
पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे? किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय? चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे? याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी पाकवॅक लस लॉन्च केली आहे. पाकिस्तान लवकरच कोरोनावरील महत्वपूर्ण औषध तयार करण्यासाठी सक्षम होणार आहे, असा दावा केला आहे.
उमर म्हणाले, कोरोना विरोधी स्वदेशी लस तयार करण्याचं संपूर्ण श्रेय राष्ट्रीय आरोग्य संस्थेला जाते. कोरोना प्रादुभार्वाच्या काळात चीननं पाकिस्तानसोबतची मैत्री निभावली आहे.
याआधीपासूनच पाकिस्तान आणि चीनचे मैत्रीचं संबंध राहिले आहेत आणि कोरोना काळात चीननं भरीव मदत करुन ते सिद्धही करुन दाखवलं आहे. पाकिस्तान सरकार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
येणार्या ईद-उल-अजहाच्या (बकरी ईद) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागू नये यासाठी लसीकरणात वेग आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
No test , no data provided, but Pakistan brings corona preventive Pakvac vaccine
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट कामगिरी, अंध गिर्यारोहक झांग यांनी सर केले एव्हरेस्ट
- सुमार खटल्यांमुळेच राष्ट्रहिताचे विषय मागे पडत चालल्याची सर्वोच्च न्यायालयाची खंत
- कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र
- ग्राहकांना घरबसल्या दारु पोहोचवण्यासाठी विविध राज्ये सरसावली, काही राज्यांनी बनविली सरकारी ॲप