विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाच्या येणाऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार असल्याची माहिती चुकीची आहे. भारतच नव्हे; जगभरातही मुलांना धोका होण्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली.No tension for children in third wave
ते म्हणाले, “कोरोनाचा संसर्ग ज्या मुलांना झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यातील ६० ते ७० टक्के मुलांना सहव्याधी होत्या. त्यांची प्रतिकार क्षमता देखील कमी होती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे कसोशीने पालन यामुळेच कोरोनाला रोखता येणार आहे.’’
संसर्गाचे प्रमाण कमी होते, व्यवहार सुरू होतात, त्यावेळी कोरोना विषयक नियमांचे पालन केले जात नाही. आता संसर्ग होणार नाही, असा लोकांचा समज होतो. लोक नियम पाळत नाही आणि पुन्हा संसर्गाचे प्रमाण वाढते.
बहुसंख्य लोकसंख्येचे लसीकरण झाले आणि प्रतिकारक्षमता वाढली की अशा लाटा थांबतील, असे गुलेरिया म्हणाले.
No tension for children in third wave
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे
- ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान
- अमेरिकेत फेडरल जज बनणारे पहिले मुस्लिम बनले जाहिद कुरेशी, सिनेटने दिली मान्यता
- पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद
- G-7 Summit : ब्रिटन आणि फ्रान्सदेखील जगात लसीचे दान करणार, यापूर्वीच अमेरिकेची 50 कोटी डोस दान देण्याची घोषणा