विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बलात्कारितेची ओळख उघड होऊ नये असा देशाचा कायदा आहे. मात्र, हा कायदा मोडून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कारितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्विट केला. याबाबात तक्रार दाखल झाल्यावर ट्विटरने राहूल यांचे खाते ब्लॉक केले. यामुळे आता कॉँग्रेसने ट्विटरलाच धमकी दिली.No one will be able to stop,Congress challenge Twiter
कॉँग्रेसने म्हटले आहे की एका नऊ वर्षांच्या दलित मुलीचा लैंगिक अत्याचारामुळे मृत्यू झाला आहे. या कुटुंबाला राहूल गांधी भेटले. त्यावरून त्यांचे खाते लॉक करण्यात आले. आम्ही तुम्हाला आव्हान देतो की न्यायासाठी लढण्यापासून आणि सत्य उघड करण्यापासून आम्हाला काहीही अडवणार नाही. कॉँग्रेसने मी देखील राहूल (मैं भी राहूल) हॅशटॅगसह हे ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी दिल्ली छावणीजवळच्या स्मशानभूमीत पुजारी आणि इतर तीन जणांच्या कथित बलात्कारानंतर मरण पावलेल्या नऊ वर्षांच्या दलित मुलीच्या कुटुंबाला भेटल्याचा फोटोही ट्विट केला.राहुलगांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. हे सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तोपर्यंत राहूल गांधी आपल्या इतर प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्याशी संपर्कात राहील आणि लोकांसाठी आवाज उठवत राहतील. त्यांच्यासाठी लढत राहतील, असे काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून शनिवारी कारवाई करण्यात आली. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती.याप्रकरणी राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
तर काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधत ट्विटरला भीती दाखवली जात असल्याचा आरोप केला आहे.बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी भाजपा आणि मोदी सरकार ट्विटरला भीती दाखवण्यात व्यस्त असून राहुल गांधींचाही बेकायदेशीरपणे पाठलाग करत आहे. त्यांनी याच वेळेचा वापर पीडितेला न्याय देण्यासाठी केला असता तर दिल्ली आज एक सुरक्षित ठिकाण असते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.
No one will be able to stop,Congress challenge Twiter
महत्तवाच्या बातम्या
- कोविन अॅप जबरदस्त, कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले मोदी सरकारचे कौतुक
- महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !
- केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी
- पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार