• Download App
    गरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी|No need for loudspeakers or DJs in Garbiya High Court's unanimous opinion, celebrate Navratri without disturbing others

    गरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी

    वृत्तसंस्था

    मुंबई : नवरात्राच्या काळात देशभर आदिशक्तीची पूजा केली जाते. ही पूजा केली जात असताना ध्यान आणि एकाग्रता महत्त्वाची असते. असे ध्यान लावून पूजा करणे गर्दी-गोंगाटात शक्य नसते. त्यामुळे नवरात्राच्या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या गरबा किंवा दांडियासाठी लाऊडस्पीकर आणि डीजेसारख्या अत्याधुनिक साउंड सिस्टिमची आवश्यकता नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी व्यक्त केले.No need for loudspeakers or DJs in Garbiya High Court’s unanimous opinion, celebrate Navratri without disturbing others

    नवरात्रासारखे उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाऊ शकतात

    दांडिया किंवा गरबा हे धार्मिक उत्सवाचा एक भाग असला तरी अजूनही असे उत्सव पूर्णपणे पारंपरिक आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून साजरे केले जाऊ शकतात. त्यासाठी लाऊडस्पीकर किंवा डीजेसारख्या आधुनिक साउंड सिस्टिमची आवश्यकता नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.



    न्या. सुनील शुक्रे आणि न्या. गोविंद सानप यांच्या खंडपीठाने यासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या भक्तांच्या पूजेत व्यत्यय येत असेल किंवा स्वत: भक्तच असा व्यत्यय आणत असतील तर ती देवीची पूजा होऊ शकत नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

    ध्वनिप्रदूषण नियम -२००० नुसार शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या खेळांच्या मैदानावर दांडिया किंवा गरबा खेळला जात असेल तर अशा भागात आधुनिक साउंड सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध करावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिले.

    न्यायालय म्हणाले…

    देवीची पूजा गोंगाट किंवा इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने केली जात असेल तर नवरात्रातील देवतेची पूजा मन एकाग्र ठेवून होऊ शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर “नाही’ असेच आहे. खरा भक्त ही पूजा विचलित न होता किंवा इतरांना त्रास न होऊ देता करू इच्छित असतो.

    No need for loudspeakers or DJs in Garbiya High Court’s unanimous opinion, celebrate Navratri without disturbing others

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!

    गुजरात किनारपट्टीवर ATS ने 14 पाकिस्तानी पकडले, 602 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त!