माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक म्हणून कार्यभार स्वीकारताच शिस्त लावणे सुरू केले आहे. आता सीबीआय कार्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून येता येणार नाही. पुरुष अधिकाऱ्यांना कार्यालयात फॉर्मल शर्ट-पॅन्ट आणि फॉर्मल शूज घालूनच यावं लागणार आहे. त्याचबरोबर योग्य पद्धतीने दाढी करावीं लागणार आहे. तर महिला अधिकाऱ्यांनी फक्त साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट घालूनच कार्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.No , jeans, t-shirt, sports shoes for CBI officials: dress code by newly elected director Subodh Jaiswal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक म्हणून कार्यभार स्वीकारताच शिस्त लावणे सुरू केले आहे.
आता सीबीआय कार्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून येता येणार नाही. पुरुष अधिकाऱ्यांना कार्यालयात फॉर्मल शर्ट-पॅन्ट आणि फॉर्मल शूज घालूनच यावं लागणार आहे.
- सीबीआयने अटक केलेल्या मदन मित्रा, सोवन चटर्जींच्या छातीत दुखले, कोलकात्यातील हॉस्पिटलमध्ये केले दाखल
त्याचबरोबर योग्य पद्धतीने दाढी करावीं लागणार आहे. तर महिला अधिकाऱ्यांनीफक्त साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट घालूनच कार्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्या आदेशानुसार सहाय्यक संचालक (प्रशासन) अनूप टी मॅथ्यू यांनी एक निवेदन जारी केलं आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि नुकताच सीबीआयच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळलेले
सुबोध कुमार जयस्वाल यांनी सीबीआय कार्यालयात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सीबीआयचे अधिकारी आता कामावर असताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालू शकणार नाहीत. महिलांना साडी किंवा सूट घालूनच कार्यालयात यावे लागणार आहे.
सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी 26 मे रोजी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.
अखेर सीबीआय संचालकपदी त्यांचीच नियुक्ती करण्यात आली. 1985 च्या बॅचमधील जयस्वाल यांची 2 वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यापासून ही 2 वर्षांची मुदत असेल.
सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रामध्ये काम केले आहे.फअह मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता.
सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते. मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे. जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.
No , jeans, t-shirt, sports shoes for CBI officials: dress code by newly elected director Subodh Jaiswal
महत्त्वाच्या बातम्या
- Juhi Chawla 5G Plea : 5G प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा जुही चावलाला दणका, याचिका फेटाळत 20 लाखांचा दंड
- Maratha Reservation : भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेकडे राज्याचे लक्ष
- लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक