• Download App
    बारमधील ऑर्केस्ट्रातल्या लिंगभेदाला थारा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका । no Gender discrimination in bar orchestra Supreme Court cancels

    बारमधील ऑर्केस्ट्रातल्या लिंगभेदाला थारा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बारमधील ऑर्केस्ट्रात गायक व वादक महिला आणि पुरुष अस लिंगभेद करणे अयोग्य असून त्याला थारा दिला जाणार नाही,अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दणका दिला आहे. no Gender discrimination in bar orchestra Supreme Court cancels

    बारमधील ऑर्केस्ट्रात वादक व गायक असे आठच लोक असावेत व त्यामध्ये प्रत्येकी चार पुरुष व चार महिला असाव्यात, अशी महाराष्ट्र सरकारने अट घातली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.



    सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एम. जोसेफ व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. बारमधील ऑर्केस्ट्रात काम करण्यासाठी फक्त आठच लोकांना परवानगी देण्यात येईल. मग त्यात पुरुषांची संख्या जास्त असो वा महिलांची त्याबद्दल कोणतेही बंधन असणार नाही. या ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या, गाणाऱ्या महिला या समाजाच्या विशिष्ट वर्गातून आलेल्या असतात, असा पारंपरिक दृष्टिकोन आहे. अशा विचारांतून मग लिंगभेदभाव सुरू होतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

    no Gender discrimination in bar orchestra Supreme Court cancels

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Union Cabinet : कोटा ग्रीनफील्ड विमानतळाला केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; 1507 कोटी रुपयांचे बजेट दिले

    CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक- NDA उमेदवार राधाकृष्णन यांचा अर्ज दाखल; मोदी पहिले प्रस्तावक

    Prasad Lad : प्रसाद लाड म्हणाले- बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम झाला