वृत्तसंस्था
पाटणा : Nitish Kumar जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीशकुमार गुरुवारी पाटणा येथील गांधी मैदानात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शपथ घेणार आहेत. ते १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.Nitish Kumar
बुधवारी सकाळी ११:३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश यांची नेतेपदी निवड झाली. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड झाली आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली.दुपारी ३:४६ वाजता विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश यांची एकमताने नेतेपदी निवड झाली.Nitish Kumar
नितीश स्वतःचाच विक्रम मोडणार
नितीश गुरुवारी १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन इतिहास रचतील. ते स्वतःचाच विक्रम मोडतील. यापूर्वी त्यांनी ७ व्या, ८ व्या आणि ९ व्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला होता.या यादीत त्यांच्यानंतर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता आणि हिमाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा समावेश आहे. दोन्ही नेते प्रत्येकी सहा वेळा मुख्यमंत्री राहिले.
Nitish Kumar Swearing-in 10th Time Bihar CM NDA Leader Gandhi Maidan Modi Photos Videos Ceremony
महत्वाच्या बातम्या
- Rohini Acharya : लालू कुटुंबात कलह : रोहिणी म्हणाल्या- किडनी देण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला
- China Japan : चीन-जपानमध्ये वाद पेटला; जपानी पंतप्रधानांचे तैवानच्या रक्षणाचे वक्तव्य, चीनने म्हटले- हे चिथावणीखोर विधान
- Shivamogga : कर्नाटकातील शिवमोगा येथे धर्म विचारून तरुणावर हल्ला; हिंदू असल्याचे सांगितल्यावर मारहाण, 50,000 लुटले
- Bangladesh : बांगलादेशात हसीना यांचे वक्तव्य छापण्यास बंदी, सरकारने माध्यमांना दिला कडक इशारा