• Download App
    नितीश कुमार यांनी स्वत:च्याच पक्षाच्यान नेत्याचा केला निषेध, म्हणाले पंतप्रधानपदात रस नाही|Nitish Kumar protested against his own party leader, saying he was not interested in becoming the Prime Minister

    नितीश कुमार यांनी स्वत;च्याच पक्षाच्यान नेत्याचा केला निषेध, म्हणाले पंतप्रधानपदात रस नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात २०१९ च्या निवडणुकांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, जनता दलाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच नितीश कुमार यांच्यातहीपंतप्रधा बनण्याची क्षमता आहे असे म्हटल्यावर त्याचा नितीश कुमार यांनी निषेध केला. आपल्याला या गोष्टींमध्ये  रस नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.Nitish Kumar protested against his own party leader, saying he was not interested in becoming the Prime Minister

    कुशवाह यांनी म्हटले होते की, लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले आणि आज ते चांगले काम करत आहेत. पण देशात इतरही नेते आहेत ज्यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. नितीश कुमार हे अशा नेत्यांपैकी एक आहेत.



    नितीशकुमार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची सर्व क्षमता आहे आणि त्याबद्दल शंका नाही. त्याला पीएम-मटेरियल म्हटले पाहिजे. हे पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याविषयी नाही असेही कुशवाहा यांनी म्हटले होते.

    कुशवाहा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. मात्र, स्वत: नितीश कुमार यांनीच त्याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, असे काहीही नाही. पंतप्रधानपदाचे मटेरियल मीच का असावे? मला या सर्व गोष्टींमध्ये रस नाही.

    बिहारचे मंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी म्हणाले की, जनता दलाने गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त ४३ जागा जिंकल्या होत्या. तरीही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. बिहारमध्ये भाजप-जदयू युती सरकार चालवणे आव्हानात्मक आह. भाजपाला अनेक गोष्टी सहन कराव्या लागत आहेत.

    Nitish Kumar protested against his own party leader, saying he was not interested in becoming the Prime Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद