• Download App
    आरोपांना उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात, नितेश राणे यांचा सवाल|Nitesh Rane asks why the Chief Minister wears a belt around his neck when it comes time to answer the allegations

    आरोपांना उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात, नितेश राणे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    कणकवली : जेव्हा सरकार पडण्याची, आरोपांना उत्तरे द्यायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लता दिदींच्या अंतीम दर्शनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. मात्र, विधिमंडळ अधिवेशन सुरु असते तेव्हा मुख्यमंत्री आजारी कसे पडतात?महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची चौकशी लागते तेव्हाच त्यांना कोरोना का होतो,Nitesh Rane asks why the Chief Minister wears a belt around his neck when it comes time to answer the allegations

    असे प्रश्न आम्ही विचारायचे का? असा सवाल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.राणे म्हणाले, मी न्यायालयीन कोठडीत असताना माझ्या प्रकृतीबाबत ज्यांनी आरोप केले ते पाहून मला आश्चर्य वाटले. मला शुगर आणि पाठिच्या मणक्याचा त्रास यापूवीर्ही होता.



    मी न्यायालयीन कोठडीत असतानाही माझी तपासणी झाली तेव्हाही त्याबाबत रिपोर्ट आले. तरीही काही लोकांनी हा राजकीय आजार असल्याची टीका माझ्या आजारावर केली. कोणाच्याही आजारपणावरुन टीका करणे हे योग्य नाही.

    संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर, आजारातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा बोलेन तेव्हा अनेकांची बीपी वाढायला सुरुवात होईल असे सांगून नितेश राणे म्हणाले, पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मी पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी माहिती हवी होती ती दिली. तपासकार्यात मी सातत्याने मदत करत होतो.

    Nitesh Rane asks why the Chief Minister wears a belt around his neck when it comes time to answer the allegations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही