विशेष प्रतिनिधी
कणकवली : जेव्हा सरकार पडण्याची, आरोपांना उत्तरे द्यायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लता दिदींच्या अंतीम दर्शनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. मात्र, विधिमंडळ अधिवेशन सुरु असते तेव्हा मुख्यमंत्री आजारी कसे पडतात?महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची चौकशी लागते तेव्हाच त्यांना कोरोना का होतो,Nitesh Rane asks why the Chief Minister wears a belt around his neck when it comes time to answer the allegations
असे प्रश्न आम्ही विचारायचे का? असा सवाल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.राणे म्हणाले, मी न्यायालयीन कोठडीत असताना माझ्या प्रकृतीबाबत ज्यांनी आरोप केले ते पाहून मला आश्चर्य वाटले. मला शुगर आणि पाठिच्या मणक्याचा त्रास यापूवीर्ही होता.
मी न्यायालयीन कोठडीत असतानाही माझी तपासणी झाली तेव्हाही त्याबाबत रिपोर्ट आले. तरीही काही लोकांनी हा राजकीय आजार असल्याची टीका माझ्या आजारावर केली. कोणाच्याही आजारपणावरुन टीका करणे हे योग्य नाही.
संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर, आजारातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा बोलेन तेव्हा अनेकांची बीपी वाढायला सुरुवात होईल असे सांगून नितेश राणे म्हणाले, पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मी पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी माहिती हवी होती ती दिली. तपासकार्यात मी सातत्याने मदत करत होतो.
Nitesh Rane asks why the Chief Minister wears a belt around his neck when it comes time to answer the allegations
महत्त्वाच्या बातम्या
- आता कारमधील सर्व प्रवाशांना थ्री पॉर्इंट सीट बेल्ट बंधनकारक, नितीन गडकरी यांची माहिती
- नवज्योत सिंग सिध्दू म्हणतात, शेवटच्या श्वासापर्यंत करणार ख्रिश्चन धर्माचे रक्षण
- इंग्रजीचे प्रकांड पंडीत शशी थरुर यांना रामदास आठवले यांनी दिले इंग्रजी स्पेलींगचे धडे
- सर्व गरीब, पीडित, वंचितांपर्यंत सरकारी योजनांचे 100% लाभ पोचवणे हाच खरा सेक्युलॅरिझम ;मोदी