• Download App
    अमूल-नंदिनी वादावर निर्मला सीतारामन यांची रोखठोक प्रतिक्रिया, काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटकात अमूलची एंट्री, निवडणुकीमुळे केला जातोय भावनिक मुद्दा|Nirmala Sitharaman's sharp reaction to the Amul-Nandini dispute, Amul's entry in Karnataka during the Congress government, election made an emotional issue

    अमूल-नंदिनी वादावर निर्मला सीतारामन यांची रोखठोक प्रतिक्रिया, काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटकात अमूलची एंट्री, निवडणुकीमुळे केला जातोय भावनिक मुद्दा

    प्रतिनिधी

    बंगळुरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले की, कर्नाटकात अमूल ब्रँडचा प्रवेश काँग्रेसच्या काळात झाला. त्या म्हणाल्या- नंदिनी ब्रँड नष्ट करण्यासाठी अमूल कर्नाटकात आणले जात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. राज्यातील निवडणुकांमुळे अमूलच्या प्रवेशाला भावनिक मुद्दा बनवले जात आहे. बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली.Nirmala Sitharaman’s sharp reaction to the Amul-Nandini dispute, Amul’s entry in Karnataka during the Congress government, election made an emotional issue

    निर्मला म्हणाल्या- मी बंगळुरूत नंदिनी आणि दिल्लीत अमूल दूध खरेदी करते

    निर्मला सीतारामन म्हणाल्या- जेव्हा मी बंगळुरूला आले तेव्हा मी नंदिनीचे दूध, दही आणि पेढे खाल्ला, तर दिल्लीत मी अमूलचे दूध घेते. मी दिल्लीत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करते, पण नंदिनीचे दूध तिथे उपलब्ध नसेल तर मी दूध पिणार नाही, असा त्याचा अर्थ नाही. मी अमूल दूध विकत घेईन आणि हे कर्नाटकच्या विरोधात नाही.



    नंदिनी ब्रँडच्या उत्पादनांची इतर राज्यांतही विक्री

    अर्थमंत्र्यांनी सांगितले की, नंदिनी ब्रँड केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही आपली उत्पादने विकते. त्याचप्रमाणे इतर राज्यांतील दुग्धजन्य पदार्थही कर्नाटकात विकले जातात. ही चांगली स्पर्धा आहे. यामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे.

    Nirmala Sitharaman’s sharp reaction to the Amul-Nandini dispute, Amul’s entry in Karnataka during the Congress government, election made an emotional issue

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!