• Download App
    "भिंतीच्या उंची एवढी कॅशची उंची" एवढा मोठा पुरावा सापडलाय, अखिलेश यादव त्यांचे पार्टनर आहेत काय?; निर्मला सीतारामन यांच्या तोफा |Nirmala Sitaraman gives befitting replay to Akhilesh Yadav

    “भिंतीच्या उंची एवढी कॅशची उंची” एवढा मोठा पुरावा सापडलाय, अखिलेश यादव त्यांचे पार्टनर आहेत काय?; निर्मला सीतारामन यांच्या तोफा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापाऱ्यांच्या घरांवर पडलेल्या प्राप्तिकराच्या छाप्यांच्या मुद्द्यावरून निर्मला केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी एकापाठोपाठ एक तोफा डागल्या आहेत.Nirmala Sitaraman gives befitting replay to Akhilesh Yadav

    माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्याकडे सापडलेला पैसा भाजपचा असल्याचा आरोप केला होता. त्याला निर्मला सीतारामन यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. “भिंतीच्या उंचीएवढी कॅशची उंची” एवढा मोठा पुरावा सापडला आहे.



    कोणा सामान्य व्यक्तीच्या घरात एवढे असते का? आणि अखिलेश यादव यांना तरी कसे माहिती की एवढी मोठी कॅश संबंधित व्यापाऱ्याकडे आहे ते!! ते त्यांचे पार्टनर आहेत का? अखिलेश यादव म्हणतात हा पैसा भाजपचा आहे. पण मुळात एवढी मोठी कॅश त्या व्यापाऱ्याकडे आहे हे त्यांना कसे कळले?

    सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट कळु शकत नाही. एखादा व्यक्ती पार्टनर असेल तर दुसर्‍या पार्टनर कडे किती पैसा आहे हे त्याला समजू शकते. मग अखिलेश यादव हे त्या व्यापाऱ्यांचे पार्टनर आहेत का?, असा खोचक सवाल निर्मला सीतारामन यांनी केला.

    अखिलेश यादव यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सारख्या प्रोफेशनल डिपार्टमेंट वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे गैर आहे. त्यांचे अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. भिंतीच्या उंचीएवढी कॅशची उंची झाली एवढा मोठा पुरावा सापडला. 23 किलो सोने सापडले आणि अखिलेश यादव म्हणतात निवडणुका असल्यामुळे इन्कम टॅक्स छापे मारले.

    चोरांना रेड हँड पकडायचे की निवडणुकीचा मुहूर्त पाहत बसायचे? की निवडणुकीच्या मुहूर्तानंतर चोरांना पकडायला जायचंय??, असा सवालही निर्मला सीतारामन यांनी केले केला.

    निर्मला सीतारामन आज अत्यंत आक्रमक मूडमध्ये होत्या. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील छाप्यावर उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. आता समाजवादी पक्षाकडून सीतारामन यांच्यावर यांच्या उत्तरांवर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Nirmala Sitaraman gives befitting replay to Akhilesh Yadav

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले