• Download App
    अमेरिकेत कोलोरॅडो येथे आग, शेकडो घरे जळून खाक | Fire in Colorado, USA, hundreds of homes burned to the ground

    अमेरिकेत कोलोरॅडो येथे आग, शेकडो घरे जळून खाक

    विशेष प्रतिनिधी

    कोलोरॅडो: अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील जंगलात आग लागली आहे. या आगीमुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ही आग डेनवरच्या उत्तर बाजूला बोल्डर काउंटीमध्ये जलदगतीने पसरत आहे. यामुळे लोकांचे जखमी व मृत्यू होण्याची संख्या वाढेल असे अधिकारी सांगतात.

    Fire in Colorado, USA, hundreds of homes burned to the ground

    या आगीमुळे लुइव्हिल व सुपिरियर या शहरामधील सुमारे ३०००० हजार लोकांना गुरुवारी स्थलांतर करण्यास सांगितले आहे. गव्हर्नर जेरेड पॉलास यांनी आणिबाणी जाहीर केली आहे. ही आग निसर्गाची शक्ती आहे असे गव्हर्नर म्हणाले. ते म्हणाले की आपण अपेक्षा करतो की हवामान बदलेल व वारे कमी होतील. ते म्हणाले की जे लोक यात सापडले आहेत त्यांनी स्वतःला एकटे समजू नये.


    Ahmednagar Hospital Fire: भय इथले संपत नाही ! आईला वाचवलं पण माझ्या डोळ्यासमोर वडिलांनी जीव सोडला…आपबिती ….हृदयद्रावक कहाण्या…


    ऐतिहासिक दुष्काळानंतर १०५ mph (१६९ kph) वेगाने वारा वाहत असल्याने संपूर्ण परिसरात आग पसरत आहे. या जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या व ठिणग्या उडाल्या आणि ही आग राज्याच्या इतिहासातील विनाशकारी वणवा बनली आहे. सुपिरीयरच्या पश्चिमेला ३७० घरे तर ओल्ड टाउन भागात अनुक्रमे ३७० व २१० घरे आगीत भस्मसात झाली आहेत अशी माहिती बोल्डर काउंटीचे शेरिफ जो पेले यांनी दिली आहे.

    एक शॉपिंग मॉल व हॉटेल आगीने वेढलेले आहे. यात सात जण जखमी झाले आहेत व जीवितहानी वाढेल असल्याचे दिसते, असेही शेरिफ म्हणाले.

    Fire in Colorado, USA, hundreds of homes burned to the ground

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही