विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केरळातील कोझिकोडमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाहचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. Nipah Virus: Nipah virus raises concerns: 12-year-old boy dies in Kerala-Kozhikode; samples tested by NIV in Pune
ओनम सणानंतर केरळात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण सध्या केरळात आढळत असून, त्यातच आता निपाह व्हायरसचा संसर्ग होऊन एका मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील ‘एनआयव्ही’ने (नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट) या मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट केलं होतं. केरळमधून आलेल्या नमुने निपाह पॉझिटिव्ह आले असल्याचं प्रयोगशाळेनं म्हटलं आहे. या मुलाला कोझिकोडे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मुलाची प्रकृती गंभीर झाली होती. सुरूवातीला मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी या मुलाचा मृत्यू झाला.
निपाह विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली होती. या बैठकीत एक समिती गठीत करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, निपाह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम व इतर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मागील १२ दिवसात संपर्कात आलेल्या नागरिकांचं ट्रेसिंग केलं जात आहे. त्याचबरोबर क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने एक पथक केरळला पाठवलं आहे. हे पथक आज केरळमध्ये दाखल होणार आहे. हे पथक राज्य सरकारला मदत करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
कोझिकोडमध्ये १९ मे २०१८ साली पहिल्यांदा निपाहचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर केरळमध्ये निपाह विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत.
Nipah Virus: Nipah virus raises concerns: 12-year-old boy dies in Kerala-Kozhikode; samples tested by NIV in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- व्हायरल व्हिडिओ: तालिबान्यांनी शांततेने आंदोलन करणाऱ्या महिलांना केली मारहाण , अश्रुधुरांचे गोळे ही फोडले
- IMD Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अलर्ट; पुढील 4 दिवस कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करून जावेद अख्तर अडकले वादात, घराबाहेर प्रचंड निदर्शने सुरू
- राजू शेट्टींच्या आमदारकीचा सवाल शरद पवारांनी अलगद ढकलला राज्यपालांच्या कोर्टात