• Download App
    मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू लागला, राज्यातही रात्रीच्या संचारबंदीचे संकेत|Night curfew imposed in Madhya Pradesh, signs of night curfew in the statee

    मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू लागला, राज्यातही रात्रीच्या संचारबंदीचे संकेत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही रात्रीच्या संचारबंदीचे संकेत देण्यात आले आहेत.आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल Night curfew imposed in Madhya Pradesh, signs of night curfew in the state

    तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणा?्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत उद्या २४ रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.



    कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी गुरुवारपासून राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी लोकांना सोशल डिस्टेन्सिंग, मास्क घालण्याचे आणि कोरोनाला रोखण्यासाठी सर्व उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

    चौहान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितले की, अनेक महिन्यांनंतर मध्य प्रदेशात कोविडचे 30 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातही बुधवारी 7995 पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्येही गेल्या आठवडाभरापासून कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

    मुख्यमंत्री म्हणाले, या तिन्ही राज्यांतून मध्यप्रदेशात खूप रहदारी आहे आणि यापूवीर्ही कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट महाराष्ट्रात, नंतर गुजरात आणि नंतर मध्यप्रदेशात आल्याचा अनुभव आहे. दोन्ही जुन्या लाटेच्या काळात इंदूर आणि भोपाळमधूनच राज्यात संक्रमणाची सुरुवात झाली.

    आता पुन्हा इंदूरमधील साप्ताहिक भाग नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये तिपटीने वाढले आहेत, ही चिंतेची बाब आहे. देशातील 16 राज्यांमध्ये कोरोना त्याच्या नव्या रूपात ओमायक्रॉनमध्ये आला आहे. या प्रकाराची प्रकरणे एमपीमध्ये देखील आढळू शकतात.

    जगाचा अनुभव पाहिल्यास ओमायक्रॉनचा विस्तार झपाट्याने होतो. ब्रिटनमध्ये दररोज एक लाख केसेस आढळताहेत, तर अमेरिकेतही प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत संरक्षण आवश्यक आहे.

    Night curfew imposed in Madhya Pradesh, signs of night curfew in the state

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले

    India Census 2027 : जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान होईल, सरकार घरांची यादी आणि माहिती गोळा करेल

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- ते हिंसा पसरवत नव्हते; सर्वोच्च न्यायालयात सांगितले- वस्तुस्थिती तोडूनमोडून गुन्हेगार ठरवले