• Download App
    पुढच्या 23 दिवसांत 35 लाख शुभमंगल सावधान; 4.25 लाख कोटींची उलाढाल!! next 23 days 35 lakhs marriage in india

    पुढच्या 23 दिवसांत 35 लाख शुभमंगल सावधान; 4.25 लाख कोटींची उलाढाल!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा 2023 ची दिवाळी दणक्यात साजरी झाली. भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.5 लाख कोटींची उलाढाल झाली. पण चीनचा मोठा फटका बसला कारण भारतीयांनी “मेड इन चायना” ऐवजी “मेड इन इंडिया” वस्तूंच्या खरेदीलाच प्राधान्य दिले. next 23 days 35 lakhs marriage in india

    आता भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये आज तुळशीची लग्न मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्न मुहूर्तांचा कालावधी सुरू होणार आहे. सणासुदीच्या कालावधीबरोबरच लग्न सोहळ्यांसंदर्भातील खरेदीचा जोर पुढील काही दिवसांमध्ये वाढणार असल्याने व्यापाऱ्यांनीही यासाठी आधीपासूनच विशेष तयारी सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर लगेच सुरु होत असलेल्या लग्नाच्या सीझननिमित्त मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. यावर्षी 23 नोव्हेंबरपासून म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून लग्न सोहळ्यांचा सिझन सुरु होत आहे. हा सिझन 15 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. या पुढील 23 दिवसांत भारतात तब्बल 35 लाख लग्नं होणार आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    लग्न सोहळ्यांच्या या सिझनमध्ये जवळपास 4.25 लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कन्फ्रेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅटचे) अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी ‘कॅट’मधील संशोधन विभाग म्हणजेच कॅट रिसर्च अॅण्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीच्या हवाल्याने एक अहवाल जारी केला आहे.

    देशातील 20 मुख्य शहरांमधील व्यापारी आणि लग्नासंदर्भातील सेवा पुरवणाऱ्यांचं सर्वेक्षण केलं. केवळ दिल्लीमध्ये या सिझनदरम्यान तब्बल 3.5 लाख लग्नं होणार आहे. दिल्लीमध्येच या 23 दिवसाच्या कालावधीत जवळपास 1 लाख कोटींची उलाढाल होणार आहे. मागील वर्षी याच कालावधीत 32 लाख लग्न होणार आहे. यावेळेस एकूण खर्च 3.75 लाख कोटी इतका झालेला.

    नेमके मुहूर्त कधी?

    नक्षत्रांच्या गणनेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त 23, 24, 27, 28, 29 तारखेला आहेत. तर डिसेंबर महिन्यात 3, 4, 7, 8, 9 तारखेला तसेच 15 तारखेला लग्नाचा मुहूर्त असून हे दिवस लग्नांसाठी शुभ आहेत. यानंतर थेट जानेवारी महिन्यात शुभ दिवस असतील.

    उलाढाल वाढता वाढे

    लग्नाच्या या सीझनमध्ये जवळपास 6 लाख अशी लग्न आहेत ज्यामध्ये प्रत्येक लग्नात सरासरी किमान 3 लाख रुपये खर्च केले जातील, असं भरतीया आणि खंडेलवाल यांनी सांगितलं आहे. जवळपास 10 लाख लग्न अशी असतील ज्यात 6 लाखांहून अधिक खर्च होईल. 12 लाख लग्नांमध्ये 10 लाख रुपये खर्च केले जातील, तर 25 लाख रुपये प्रत्येक लग्नासाठी खर्च केले जातील असे 6 लाख लग्न सोहळे असतील. 50 हजार लग्न अशी आहेत ज्यामध्ये 50 लाख रुपये खर्च होतील. 50 हजार लग्न सोहळ्यांमध्ये 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एकूण या लग्न सोहळ्यांमध्ये 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतील. या सिझननंतर जानेवारीपासून ते जुलैपर्यंत लग्नांचा सिझन असेल असं सांगण्यात आलं आहे.

    next 23 days 35 lakhs marriage in india

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    EMS Natchiappan : वन नेशन वन इलेक्शन- 30 जुलै रोजी पुढील बैठक; माजी मंत्री म्हणाले- लोकप्रतिनिधी कायद्यात बदल पुरेसे, संविधानात नाही

    Actor Kota Srinivasa Rao : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास यांचे निधन; 2 दिवसांपूर्वी साजरा केला 83वा वाढदिवस

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी