विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने भारताच्या लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील जलदगतीने 100 कोटी कोरोना लसीकरण डोस अशक्य ते शक्य करून दाखविले असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले आहे.New York Times praises India’s vaccination drive, PM Modi makes impossible possible
न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे की भारतातील कोरोना विषाणूचे संकट आता कमी होताना दिसत आहे. 7 महिन्यांपूर्वीपर्यंत एकाच दिवशी हजारो लोकांचा मृत्यू होत होता, तो दिवसाला एक हजारांपेक्षा कमी झाला आहे. लसीकरण धोरणांमध्ये सुधारणा केल्याने हे शक्य होऊ शकले असे म्हटले आहे.
मोदी सरकारने 100 कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. हे यश जनतेसमोर सिद्ध करण्यात सरकारला यश आले आहे. याचा राजकीय फायदा मोदी सरकारला मिळू शकतो. दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्याच्या तयारीत मोदी सरकार अपयशी ठरले होते. मात्र, त्यानंतर सरकारने कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.
जगातील सर्वात मोठी लस निमार्ता सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने जानेवारीमध्ये भारतासाठी कोरोना लसीचे 100 मिलियन (10 कोटी) डोस बाजूला ठेवले होते, परंतु सरकारने त्या महिन्यात केवळ 11 मिलियन (11 कोटी) डोस खरेदी केले, असे अहवालात म्हटले आहे.
भारताने 100 कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. हे यश असंभव वाटत होते.मार्च 2020 पासून बंद शाळा या महिन्यात पुन्हा सुरू होत आहेत. परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे.भारत सरकारची घरोघरी लसीकरण करण्याची योजना आहे, यामुळे फायदा मिळेल.
महिनाभरापूर्वी दररोज संक्रमण 42,000 होते, आता जवळपास 12,000 प्रतिदिवस आहे. मृत्यू कमी होऊन प्रतिदिवस 400 च्या जवळपास आले आहेत, असे सांगताना न्यूयॉर्क टाईम्सने लसीकरणाची गती मंदावल्याने तसेच सणासुदीच्या काळामुळे लोक बाजारात गर्दी करत असल्याने धोका अजूनही असल्याचे म्हटले आहे.
अनेक राज्यांमध्ये लसीकरण कँप बंद करुन मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना म्हटले जातेय की, आता त्यांची गरज नाही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात केवळ 25% लोकसंख्याच पूर्णपणे व्हॅक्सीनेट होऊ शकली आहे. प्रकरणे कमी झाल्याने लोक निष्काळजी झाले आहेत. शॉपिंग मॉल, पार्क आणि मार्केटमध्ये लोक मास्क न घालता फिरत आहेत.
New York Times praises India’s vaccination drive, PM Modi makes impossible possible
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल