• Download App
    लसीकरणाच्या नव्या गाईडलाइन्स : 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस संदर्भात सोमवारी आरोग्य मंत्रालयाद्वारे नवीन गाइडलाइन्स जाहीर | New Vaccination Guidelines: Ministry of Health announces new guidelines on vaccination for children of age between 15 to 18 and about booster dose on Monday

    लसीकरणाच्या नव्या गाईडलाइन्स : १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस संदर्भात सोमवारी आरोग्य मंत्रालयाद्वारे नवीन गाइडलाइन्स जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस संदर्भात सोमवारी आरोग्य मंत्रालयाद्वारे नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या गाइडलाइन्स 3 जानेवारी 2022 पासून लागू होतील.

    New Vaccination Guidelines: Ministry of Health announces new guidelines on vaccination for children of age between 15 to 18 and about booster dose on Monday

    1. वय वर्षे 15 ते 18 या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन ही लस घेता येईल.

    2. 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस घेण्यासाठी कोवीण पोर्टलवरया रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 1 जानेवारीनंतर हे रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येईल.

    3. रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी मुले आधार कार्ड किंवा इतर कोणतेही व्हॅलिड आयडेंटीटी कार्ड वापरू शकतात. जर यापैकी कोणतेही नसेल तर दहावीचे आयडी देखील वापरू शकतात.


    WATCH : तुम्हाला माहिती आहे, घराघरांत बनणारा हा एक पदार्थ आहे Immunity Booster


    4. वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर, नर्सेस तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी कोविन वेबसाईटवर आधी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 10 जानेवारी 2022 नंतर हे डोसेस उपलब्ध होतील.

    5. 60 वर्षांवरील नागरिकांनी जर लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस घ्यावा.

    6. 60 वर्षा वरील नागरिकानी त्यांचा दुसरा डोस घेतल्यानंतर, 9 महिन्यांनी म्हणजेच 39 आठवड्यानंतर बुस्टर डोस घेणे योग्य असेल.

    गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात सांगितले की, वाढत्या ओमिक्रॉनच्या केसेस लक्षात घेता व्हॅक्सिनेशन संदर्भात या नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

    भारतात आत्तापर्यंत 578 ओमायक्रॉनच्या केसेस आढळून आलेल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

     

    New Vaccination Guidelines: Ministry of Health announces new guidelines on vaccination for children of age between 15 to 18 and about booster dose on Monday

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य