विशेष प्रतिनिधी
गांधीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वाहन स्क्रॅप (भंगार) धोरणाचा श्रीगणेशा करताना नव्या बदलांचे सूतोवाच केले आहे. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या उद्देशानेच हे धोरण राबविले जात असून यामुळे देशाच्या वाहनक्षेत्राला नवी ओळख मिळेल, असा विश्वाससही मोदींनी व्यक्त केला. New scrap policy generate thousand of new jobs
या नव्या धोरणामुळे या क्षेत्रामध्ये दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामुळे रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील असा दावाही मोदींनी यावेळी केला. मागील वर्षी देशात पुरेसे धातू संकलन न झाल्याने आपल्याला २३ हजार कोटी रुपयांचे स्क्रॅप स्टील आयात करावे लागले.
आता नव्या धोरणामुळे अधिक वैज्ञानिक मार्गाने आपल्याला धातू गोळा करता येतील. आपल्याला आयातीवरील अवलंबित्व कमी करावे लागेल. त्यासाठी उद्योगक्षेत्राला देखील जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, असे मोदींनी सांगितले.
जहाजांचे रिसायकलिंग केंद्र म्हणून ओळखल्या जाणारे भावनगरमधील अलंग हे ठिकाण आता वाहनांच्या रिसायकलिंगचे देखील केंद्र बनावे अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
नव्या वाहन स्क्रॅप धोरणामुळे शहरांतील प्रदूषण कमी होईल. टाकाऊ वस्तूंमधून संपत्तीच्या निर्मितीसाठी हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मोदींनी देश यामुळे वाहन आणि धातू क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होईल, असे स्पष्ट केले.
New scrap policy generate thousand of new jobs
महत्त्वाच्या बातम्या
- लवकरच येणार नाकावाटे देण्यात येणारी लस, भारत बायोटेकला दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीसाठी मंजुरी
- कंगनाने ‘धाकड’ची शूटिंग पूर्ण होताच शेअर केले बोल्ड फोटोज, रिव्हिलिंग ड्रेसमुळे युजर्सकडून झाली ट्रोल
- भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधाराने घेतली निवृत्ती, अमेरिकेसाठी खेळण्यासाठी उचलले मोठे पाऊल
- कोरोना महामारीदरम्यान भारताचे मोठे पाऊल, या वर्षी मुलांच्या डीपीटी 3 लसीकरणाबाबतीत नवा विक्रम