वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पोलिस महासंचालकपदी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. १९८७ च्या बॅचचे ‘आयपीएस’ अधिकारी व्ही.के.भंवरा हे आता पंजाबचे नवे पोलिस महासंचालक असतील. New police chief to Punjab
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षाविषयक त्रुटी उघड झाल्यानंतर विद्यमान पोलिस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय हे टीकेचे धनी झाले होते. केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील या सुरक्षेतील त्रुटींसाठी राज्य पोलिसांना जबाबदार ठरविले होते. राज्याच्या पोलिस महासंचालकांपाठोपाठ फिरोझपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरमनदीप यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान राहिलेल्या सुरक्षाविषयक त्रुटीच त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. दरम्यान भंवरा यांनी याआधी गुप्तचर खात्याचे प्रमुख म्हणून देखील काम पाहिले होते. नव्या महासंचालकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने पंजाब सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे काही अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली होती. आता भंवरा दोन वर्षे हा पदभार सांभाळतील.
New police chief to Punjab
महत्त्वाच्या बातम्या
- BJP MAYOR : चंदीगढ महानगरपालिकेत भाजपचा महापौर-रणनिती मात्र महाराष्ट्राची ! काय आहे चंदिगढचं महाराष्ट्र कनेक्शन…
- सांगलीत पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार : शर्यतीच्या बैल गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ
- बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू; लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर दुर्घटना आठ जण जखमी
- बॅडमिंटनपटू काश्मीरा भंडारीचा पुण्यात अपघाती मृत्यू