विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. मोबाईल वापरणाऱ्या, स्वत:च्या नावावर बॅँक खाते असणाऱ्या आणि घर किंवा जमीन नावावर असलेल्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.New era of women empowerment during Modi government, huge increase in the number of women using mobile and having bank accounts
नॅशनल फॅमीली हेल्थ सर्वेनुसार महिलांच्या जीवनमानात क्रांतीकारी बदल झाले आहेत. आजपर्यंत आर्थिक व्यवहार किंवा मोबाईलसारखी माध्यमे गोरगरीब महिलांच्या हातात नव्हते. घर किंवा जमीनीमध्ये त्यांना हक्क मिळत नव्हता. परंतु, गेल्या सहा वर्षांत यामध्ये बदल झाला आहे. आता देशातील 80% महिलांचे स्वत:चे बँक खाते आहे आणि त्याचा वापरही करतात. 2015-16 हेच प्रमाण ५३ टक्के होते.
घर किंवा जमीनीची मालकी असणाऱ्या महिलांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ांजाबमध्ये 2015-16 मध्ये केवळ 32.1 टक्के महिलांच्या नावावर घर किंवा जमीन एकटीच्या किंवा संयुक्त नावावर होती. आता हेच प्रमाण 63.5 टक्के झाले आहे. उत्तर प्रदेश या देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यात तर महिलांना घर-जमीनीत अधिकार सर्वाधिक मिळाला आहे. 2015-16 मध्ये 34.2 टक्क्यांवरून 2020-2 मध्ये 51.9 टक्के महिलांच्या नावावर घर आहे.
मध्य प्रदेशमध्ये बँक खाते असलेल्या महिलांची टक्केवारी 2020-21 मध्ये 74.7 टक्के आहे. 2015-16 मध्ये हे प्रमाण केवळ 37.3 टक्के होते. झारखंड या देशातील सर्वाधिक मागास समजल्या जाणाऱ्या राज्यात तर जनधन खाते योजनेने महिलांमध्ये क्रांती केली आहे. झारखंडमध्ये 2013-16 या कालावधीत 45.1 टक्के महिलांकडे बॅँक खाते होते.
आता हेच प्रमाण 79.6 आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत गेल्या सात वर्षांत बॅँक खाते उघडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्यामुळे महिलांना बॅँकींग व्यवस्थेशी जोडण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे आत सरकारी योजनांचा लाभ थेट बॅँक खात्यांमध्ये मिळत आहे. घरातील आर्थिक निर्णयात महिलांना आता स्थान मिळाले आहे.
देशात अध्यार्हून अधिक जन धन खाती महिलांनी उघडली आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या ई-श्रम पोर्टलवरील अध्यार्हून अधिक कामगार महिला आहेत,ह्वअसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गट मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी सांगितले.
New era of women empowerment during Modi government, huge increase in the number of women using mobile and having bank accounts
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल
- अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका
- राजकीय पंगा संसदेच्या अंगणात; काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना “तृणमूळी” खोडा; ममतांचे ऐक्य प्रयत्न स्वत;च्या अटी शर्तींवर!!
- गोव्यात चिदंबरम येतात, नुसते फिरून निघून जातात!!;काँग्रेसवर हल्लाबोल करत तृणमूळच्या महुआ मोईत्रांचा मात्र मुक्काम!!