• Download App
    हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर पुरावे नष्ट केल्याचा सीबीआयचा नवा आरोप |New charge against Mehul Choksi

    हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर पुरावे नष्ट केल्याचा सीबीआयचा नवा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंजाब नैशनल बॅंक कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा नवा आरोप सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात लावला आहे.New charge against Mehul Choksi

    चोक्सीने एटिंग्वा येथील नागरिकत्व घेतले होते. मात्र आता तेथे त्याच्या विरोधात खटला सुरू आहे. नवीन आरोपपत्रात सीबीआयने काही कंपन्यांच्या १६५ सामंजस्य करारांचा उल्लेख केला आहे. काही हिरे कंपन्यांना यामार्फत गैरप्रकारे रक्कम देण्यात आली असे म्हटले आहे.



    या प्रकरणात आरोपी असलेला चोक्सीचा निकटवर्तीय नीरव मोदीविरोधातही न्यायालयाने ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे.चोक्सी सध्या डॉमनिका असून त्याचा प्रत्यार्पण खटला तेथे सुरू आहे. या प्रकरणात सीबीआयने यापूर्वी आरोपपत्र दाखल केले आहे.

    मात्र, आता पुन्हा विशेष न्यायालयात चोक्सी याच्यावर नव्याने आरोप ठेवण्यात आले आहेत. यात कटकारस्थान, बनावट खाते आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे.

    New charge against Mehul Choksi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Changur Baba : छांगूर बाबा हिंदू मुलींना मुस्लिम देशांमध्ये पाठवायचा; पीडितेकडून बलात्काराचा आरोप

    तमिळनाडूमध्ये चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्ती; स्टालिन यांचा राजकीय सहकाऱ्यांवर विश्वास उरला नसल्याची कबुली!!

    Odisha Student : ओडिशात आत्मदहनानंतर गंभीर भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू; लैंगिक छळामुळे घेतले होते पेटवून