• Download App
    राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती|Netta D'Souza appointed as President of the National Women's Congress

    राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महिला कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने कॉँग्रेसने घाईघाईने महासचिव असलेल्या नेट्टा डिसूझा यांची अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे.Netta D’Souza appointed as President of the National Women’s Congress

    काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेट्टा डिसूजा यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. नेट्टा डिसूजा यांच्याकडे राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत त्या काम करत राहतील असे प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.



    राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुष्मिता देव काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय होत्या. देव या माजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत.

    Netta D’Souza appointed as President of the National Women’s Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार