• Download App
    NDA सरकारच्या नेतृत्वपदी नरेंद्र मोदीच; 21 नेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव पारित!!; राजनाथ, शाह, नड्डा मंत्रिमंडळाबाबत मित्र पक्षांशी चर्चा करणार!!|NDA leaders unanimously elect Narendra Modi as their leader in the proposal passed by the leaders of the NDA in Delhi.

    NDA सरकारच्या नेतृत्वपदी नरेंद्र मोदीच; 21 नेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव पारित!!; राजनाथ, शाह, नड्डा मंत्रिमंडळाबाबत मित्र पक्षांशी चर्चा करणार!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2024 च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA 294 जागा मिळाल्या. त्यामुळे अर्थातच केंद्रात NDA आघाडीचेच सरकार स्थापन होणार आहे. NDA आघाडीच्या बैठकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला.NDA leaders unanimously elect Narendra Modi as their leader in the proposal passed by the leaders of the NDA in Delhi.

    NDA आघाडीच्या 21 नेत्यांची बैठक राजधानीत झाली. या बैठकीला प्रमुख घटक पक्ष तेलगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू जयूचे नेते नितीश कुमार शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 20 पक्षांचे नेते हजर होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हजर होते. या सर्व नेत्यांनी मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA सरकारच्या नेतृत्वपदी नरेंद्र मोदींचीच निवड केली. मोदींच्या नावाचा प्रस्ताव NDA बैठकीत पारित करण्यात आला. 7 जून रोजीNDA आघाडीच्या संसदीय पक्षाची म्हणजेच नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेऊन त्यामध्ये नरेंद्र मोदींच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्याची येईल. त्याचबरोबर राजनाथ सिंह अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे केंद्रात नवे सरकार स्थापन करण्याबद्दल तसेच मंत्रिमंडळाच्या रचनेबद्दल NDA आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करतील.



    NDA चा प्रस्ताव

    देशातल्या 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नेतृत्वाखाली खालील सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ विविध स्तरांवर झाला. देशाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास झाला. दीर्घ कालावधीनंतर देशातल्या जनतेने सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने एका सशक्त नेतृत्वाला निवडले आहे.

    2024 ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA मधील घटक पक्षांनी एकजुटीने लढवली लढवून जिंकली. त्यामुळे आम्ही सगळे NDA घटक पक्षांचे नेते नरेंद्र मोदींना NDA चा नेता म्हणून निवडतो.

    नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सरकार भारतातील गरीब, महिला, शेतकरी, युवक शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांची सेवा करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. भारताच्या महान वारशाची जपणूक करून देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सरकार सतत काम करत राहील.

     हा प्रस्ताव 5 जून 2024 रोजी राजधानी नवी दिल्लीत पारित झाला.

    भाजपला स्वबळावर बहुमत टिकवता आले नाही म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार की नाहीत, ते अन्य कुठल्या नेत्यावर सरकारची जबाबदारी सोपवतील, या अटकळींना आजच्या प्रस्तावामुळे पूर्णविराम लागला.

    NDA leaders unanimously elect Narendra Modi as their leader in the proposal passed by the leaders of the NDA in Delhi.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी