केरळचे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कोणत्याच मंत्र्याला दुसऱ्यांदा मंत्रीमंडळात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोना काळातील कामामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शैैलजा टिचर यांनाही दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. मात्र, राष्ट्र वादी कॉँग्रेसमुळे विजयन यांनी स्वत:चाच नियम मोडून लंैगिक शोषणाच्या आरोपातून मुक्त झालेल्या ए.के. शशिधरन यांना दुसऱ्यांदा मंत्री केले आहे. NCP’s love for Kerala Chief Minister Vijayan, Shashidharan acquitted of sexual harassment charges made minister
विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : केरळचे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कोणत्याच मंत्र्याला दुसऱ्यां दा मंत्रीमंडळात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोना काळातील कामामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शैैलजा टिचर यांनाही दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे विजयन यांनी स्वत:चाच नियम मोडून लैंगिक शोषणाच्या आरोपातून मुक्त झालेल्या ए.के. शशिधरन यांना दुसऱ्यांदा मंत्री केले आहे.
एका बाजुला देशपातळीवर आणि महाराष्ट्रात कॉँग्रेससोबत असलेल्या राष्ट्र वादीने केरळमध्ये मात्र कॉँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविली. तीन जागा लढलेल्या राष्ट्र वादीचे दोन आमदार निवडून आले आहेत. तरीही राष्ट्रवादीला मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे.
विजयन यांच्यासह राज्यपालांनी 20 नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने केरळमध्ये तीन जागांवर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. ए. के. शशीधरन आणि थॉमस के. थॉमस अशी त्यांची नावे आहेत. यात ए. के. शशीधरन यांना मंत्री पद देण्यात आले आहे. शशिंद्रन हे गेल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. शशीधरण यापूर्वी पाचवेळा आमदार होते. सुरवातीला ते काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर २०१७मध्ये शशीधरन यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, आरोप खोटे सिद्ध झाल्यानंतर ते पुन्हा मंत्री झाले
शैलजा टिचर यांच्यासारख्यांना मंत्रीमंडळातून डावलण्यासाठी नियम लावणाऱ्या विजयन यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसबाबत मात्र हा नियम लावलेला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शैलजा यांची वाढती लोकप्रियता सहन झाली नसल्यानेच त्यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याचीही चर्चा आहे.
NCP’s love for Kerala Chief Minister Vijayan, Shashidharan acquitted of sexual harassment charges made minister
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची वाढ, सततचे संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत विक्रमी वाढ
- ‘लय भारी ते घणो चोखो’ चर्चा तर होणारच ! महाराष्ट्रातील सोलापूरचे शिवप्रसाद नकाते ; राजस्थानचे IAS ऑफिसर ; वाचा यशोगाथा
- तुम्ही कुठे जात आहात,घरीच राहा ना, भाई ! जेव्हा सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबल अडवते…
- गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ