प्रतिनिधी
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अशा प्रकारची आघाडी झटकली आहे, तर भाजपच्या नेत्यांनी या आघाडीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीला जोरदार टोले हाणले आहेत. NCP – MIM Alliance The only thing left for the NCP to do is to propose ISIS
आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत शिवसेनेवर टीका करणा-या भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. कट्टरपंथीयांना सुद्धा शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे, असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
– सुप्रिया सुळेंकडून स्वागत
समविचारी पक्ष एकत्र येत असेल तर आनंदच आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विकासासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
ISIS आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना
ISIS ही आंतरराष्ट्रीय इस्लामी कट्टरपंथी दहशतवादी संघटना आहे. सीरिया आणि अन्य आफ्रिकन देशांमध्ये या संघटनेने प्रचंड दहशतवाद माजवून मोठा हिंसाचार केला आहे. नितेश राणे यांनी ISIS या संघटनेचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
– फडणवीसांचेही टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेस सध्या शिवसेनेसोबत राज्याच्या सत्तेत असल्यामुळे, यावरुन आता भाजपने शिवसेनेला टार्गेट केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना आता सत्तेसाठी काय करते, तेच आम्हाला पहायचे आहे. तसंही शिवसेनेने आता “हिंदुहृदयसम्राट” बाळासाहेब ठाकरे ऐवजी “जनाब” बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे. त्यांच्याकडून अजानच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे, त्यामुळे एमआयएमने दिलेल्या ऑफरचा आता काय परिणाम होतो ते बघू या, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
NCP – MIM Alliance The only thing left for the NCP to do is to propose ISIS
महत्त्वाच्या बातम्या
- कुटुंबातील व्यक्तींकडूनच ११ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार
- युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशींची भारताकडून सुटका
- गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती
- अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू; रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच
- कोरोनाबाबत सावधान ; मुंबईत वाढतायत कोरोनाचे रुग्ण; दक्षता घेण्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना