• Download App
    नक्षलवाद्यांचे चीन, पाकिस्तानशी लागेबांधे, शस्त्रास्त्रे मिळविल्याचे उघड, रायफली, उखळी तोफाही मिळवल्या|Naxals linked to China, Pakistan, weapons from these countries

    नक्षलवाद्यांचे चीन, पाकिस्तानशी लागेबांधे, शस्त्रास्त्रे मिळविल्याचे उघड, रायफली, उखळी तोफाही मिळवल्या

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांनी चीन आणि पाकिस्तानशीही संपर्क निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमध्ये एका नक्षलवाद्याच्या मोबाईलववरून हे उघड झाले आहे.Naxals linked to China, Pakistan, weapons from these countries

    बिहारच्या बक्सरमध्ये अटक केलेला नक्षलवादी निवेशकुमार याच्याजवळील मोबाईलमधून पीएलएफआय या अतिरेकी संघटनेचे चीन व पाकिस्तानशी संबंध निर्माण केल्याचे दिसून आले आहे. या संघटनेचा म्होरक्या दिनेश गोप याला पाक व चीनसारख्या देशांतून शस्त्रास्त्रे मिळत आहेत. पाकिस्तानमधील एकाशी व्हॉटसअ‍ॅप आणि व्हिडिओ चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे.



    दिनेश गोपपर्यंत शस्त्रास्त्रे पोहोचविण्याचे काम त्याचा खास साथीदार निवेशकुमार करीत होता. व्हॉट्सअ‍ॅपवर शस्त्रास्त्रांची छायाचित्रेही टाकली आहेत. निवेश हाच विदेशी शस्त्रे खरेदी करीत होता व ती पीएलएफआयचा म्होरक्या दिनेश गोप याच्याकडे देत होता, हे सिद्ध झाले आहे. दिनेश गोपच्या पैशातून शस्त्रास्त्रांची खरेदी केली जात होती.

    व्हिडिओ चॅटमध्ये पाकिस्तानमधील ज्या व्यक्तीशी चर्चा झाली होती, त्याने पगडी बांधलेली व दाढी वाढवलेली दिसते. स्वीस रायफलसह अनेक शस्त्रांची छायाचित्र आढळली आहेत. त्यात एके ४७ व उखळी तोफांसारखी शस्त्रास्त्रे पोहोचविल्याचेही दिसते.

    दिनेश गोपने विदेशातून शस्त्रास्त्रे मागविली होती, अशी माहिती पोलिसांना यापूर्वी मिळाली होती. आता रांची पोलीस स्वीस रायफलसह इतर शस्त्रास्त्रांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.

    पीएलएफआयसाठी काम करणारा निवेशकुमार, शुभम कुमार, ध्रुव कुमार व अंजली कुमारीला बक्सरमध्ये सोमवारी रात्री अटक केली होती. यातील अंजली कुमारी ही निवेशची मैत्रिण आहे. सर्व जण एका कारमधून दिल्लीहून येत होते. पोलिसांनी आरोपींकडून १२ लाख रोख, एक कार व १४ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

    Naxals linked to China, Pakistan, weapons from these countries

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य