विशेष प्रतिनिधी
मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन जमेच्या या तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणात 3 ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीने ताब्यात घेतले होते.
Nawab Malik’s reaction after Aryan Khan’s bell was approved, ” पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ”
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जाणूनबुजून या प्रकरणात गुंतवले आहे आणि अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी सुरुवातीपासून केला होता. त्यानंतर त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी पुराव्यासह ट्विटरवर हे आरोप केले होते.
या प्रकरणामध्ये प्रभाकर साईल नामक एनसीबीच्या पंचने समीर वानखेडे यांच्याविरोधात लाचखोरीचे आरोप केले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी समितीदेखील नेमण्यात आली होती. ही चौकशी पूर्ण होण्या आधीच त्यांना केंद्र सरकार द्वारे झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली होती. या सर्व घटनांनंतर आता फायनली आर्यन खान याला बेल मंजूर झाली आहे. त्या नंतर नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” अशा सहा शब्दांमध्ये नवाब मलिक यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
वानखेडे हे मुस्लीम असून चुकीच्या पध्दतीने कागदपत्रांचा वापर करून नोकरी मिळवली आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मागील तीन आठवड्यामध्ये नवाब मलिक आणि समीर वानखेडे या दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. आता यापुढे देखील नवाब मलीक वानखेडे संदर्भात बरीच कागदपत्रे वेळोवळी पुढे आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
Nawab Malik’s reaction after Aryan Khan’s bell was approved, ” पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त “
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन