• Download App
    नवज्योत सिंग सिध्दू बनलेत पंजाबच्या कॉमेडी सर्कस सरकारचे प्रमुख; भाजपकडून आली बोचरी प्रतिक्रिया। Navjot Singh Sidhu becomes head of Punjab's comedy circus government

    नवज्योत सिंग सिध्दू बनलेत पंजाबच्या कॉमेडी सर्कस सरकारचे प्रमुख; भाजपकडून आली बोचरी प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था

    चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये बऱ्याच उलथापालथी नंतर नवज्योत सिंग सिध्दू यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपकडून पहिलीच बोचरी प्रतिक्रिया आली आहे. नवज्योत सिंग सिध्दू हे पंजाबच्या कॉमेजी सर्कस सरकारचे प्रमुख बनले आहेत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया भाजपचे सरचिटणीस तरूण चुग यांनी व्यक्त केली. Navjot Singh Sidhu becomes head of Punjab’s comedy circus government

    तरूण चुग म्हणाले, की काँग्रेसने आतापर्यंत पंजाबमध्ये किमान अर्धा डझन प्रदेशाध्यक्ष बनवले आहेत. काँग्रेस नेतृत्वाला कॅप्टन अमरिंदर सिंग यांना वेसण घालायची आहे. पण त्या पैकी कोणत्याही प्रदेशाध्यक्षाला ती असाइनमेंट पूर्ण करता आलेली नाही. आता नवज्योत सिंग सिध्दू यांना अमरिंदर सिंग यांच्या पायात पाय घालण्यासाठी पाठविले आहे.



    याचा अर्थच असा आहे, काँग्रेस नेतृत्वाला कळून चुकले आहे की अमरिंदर सिंग सरकार फेल झाले आहे. त्यामुळे आता पंजाबच्या कॉमेडी सर्कस सरकारचे प्रमुख होण्यासाठी नवज्योत सिंग सिध्दू यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी बोचरी टीकाही तरूण चुग यांनी केली.

    पंजाब काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. भाजपच्या काही नेत्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नवज्योत सिध्दू यांचे काँग्रेस नेतृत्वाने महत्व वाढविले की अस्वस्थ अमरिंदर सिंग यांच्याशी भाजप नेते राजकीय तडजोड करतील, अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस तरूण चुग यांनी अमरिंदर सिंग यांचे सरकार अपयशी असल्याची टीका केली आहे. त्याला महत्त्व आहे.

    Navjot Singh Sidhu becomes head of Punjab’s comedy circus government

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले