• Download App
    खलिस्तानी-गँगस्टर नेटवर्कवर राष्ट्रीय तपास संस्थेची धडक कारवाई; पंजाब-हरियाणा, राजस्थानसह 6 राज्यांत 51 ठिकाणी धाडी|National Investigation Agency crackdown on Khalistani-gangster network; Run at 51 locations in 6 states including Punjab-Haryana, Rajasthan

    खलिस्तानी-गँगस्टर नेटवर्कवर राष्ट्रीय तपास संस्थेची धडक कारवाई; पंजाब-हरियाणा, राजस्थानसह 6 राज्यांत 51 ठिकाणी धाडी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने (NIA) खलिस्तानी आणि गुंडांच्या नेटवर्कविरोधात बुधवारी 6 राज्यांमध्ये एकाचवेळी कारवाई केली. एजन्सीने बुधवारी सकाळी पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील 51 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.National Investigation Agency crackdown on Khalistani-gangster network; Run at 51 locations in 6 states including Punjab-Haryana, Rajasthan

    लॉरेन्स, बांबिहा आणि अर्श डल्ला टोळीच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणी ही कारवाई केली जात आहे. खलिस्तानी दहशतवादी अर्श डल्लाचा जवळचा झोरा सिंग याला पंजाबमधील फिरोजपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या मोबाइलमध्ये अर्श डल्लासोबत चॅटिंग केल्याचे पुरावे सापडले आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.



    एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये सुमारे ३० ठिकाणी आणि हरियाणामध्ये ४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने यूपीच्या पिलीभीत, लखीमपूर खेरी, अलीगढ, सहारनपूर येथे छापे टाकले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू असताना तपास यंत्रणेची ही कारवाई समोर आली आहे.

    पंजाबमधील भटिंडा येथे गॅंगस्टर हॅरी आणि गुरप्रीतच्या घराची झडती

    पंजाबमधील फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, मोगा, फरीदकोट, पटियाला, बर्नाला आणि मानसा येथे छापे टाकण्यात आले आहेत. भटिंडा येथे बुधवारी सकाळी 6 वाजता एनआयएच्या दोन पथके रामपुरा आणि मोड मंडी येथे पोहोचली. हे पथक जेठुके गावात गुरप्रीत सिंग उर्फ ​​गुरीच्या घराची झडती घेत आहे. गुरी हा भटिंडा पोलिसांना खुनासह अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी आहे. हॅरी मोरच्या घरी एक टीम पोहोचली आहे. हॅरीचेही अनेक प्रकरणांमध्ये नाव आहे.

    एनआयएचे पथक मध्यरात्री राजस्थानच्या 13 जिल्ह्यांमध्ये पोहोचले एनआयएचे पथक राजस्थानातील 13 जिल्ह्यांमध्ये हनुमानगड, झुंझुनू, गंगानगर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, सीकर, पाली, जोधपूर ग्रामीण, बारमेर, कोटा ग्रामीण, भीलवाडा आणि अजमेरमध्ये शोध घेत आहेत. एनआयए ज्या ठिकाणी छापे टाकत आहे तेथील लोकांच्या बँक खात्यातील व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. अलीकडेच राजस्थानमधील 10 हून अधिक जिल्हे खलिस्तानींच्या नव्या नकाशात दाखवण्यात आले आहेत.

    National Investigation Agency crackdown on Khalistani-gangster network; Run at 51 locations in 6 states including Punjab-Haryana, Rajasthan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज