• Download App
    देशाला मिळणार 5 वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदी भोपाळमध्ये दाखवणार हिरवा झेंडा|Nation will get gift of 5 Vande Bharat trains, PM Modi will show green flag in Bhopal

    देशाला मिळणार 5 वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदी भोपाळमध्ये दाखवणार हिरवा झेंडा

    वृत्तसंस्था

    भोपाळ : भारतीय रेल्वे 27 जून म्हणजेच मंगळवारी देशवासियांना एकाच वेळी पाच नवीन वंदे भारत ट्रेन देणार आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजधानी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून सकाळी 11च्या सुमारास ते पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यादरम्यान राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस वगळता उर्वरित चार गाड्यांना पंतप्रधान व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवतील.Nation will get gift of 5 Vande Bharat trains, PM Modi will show green flag in Bhopal

    पंतप्रधान मोदी या 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी भोपाळहून राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, खजुराहो-भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड-बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि रांची-पाटणा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. मध्य प्रदेशला यावेळी दोन वंदे भारत गाड्या मिळतील. त्याचबरोबर गोवा, बिहार आणि झारखंड या राज्यांना पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. याशिवाय कर्नाटकला दुसऱ्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.



    मध्य प्रदेशला दोन वंदे भारत गाड्या मिळणार

    मध्य प्रदेशात राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस भोपाळ आणि जबलपूरला जोडेल. राज्यातील अनेक पर्यटन स्थळांमधून ती जाणार आहे. यामध्ये भेडाघाट, पंचमढी आणि सातपुडा यांचा समावेश आहे. तर खजुराहो-भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेन राज्यातील माळवा आणि बुंदेलखंड भागांना भोपाळशी जोडेल. यादरम्यान ही ट्रेन महाकालेश्वर, मांडू, महेश्वर, खजुराहो या पर्यटनाच्या महत्त्वाच्या ठिकाणांवरून जाणार आहे.

    बिहार, झारखंड आणि गोव्याला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार

    बिहार आणि झारखंडच्या प्रवाशांचीही प्रतीक्षा आता संपत आहे. या दोन राज्यांना संयुक्तपणे पहिली ट्रेन मिळणार आहे. अप आणि डाऊन दिशेने ही ट्रेन जेहानाबाद, गया, बरकाकाना, कोडरमा, हजारीबाग टाऊन आणि मेसरामार्गे चालवली जाईल. ही ट्रेन पाटणा ते रांची हे अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण करेल. ही ट्रेन मंगळवार वगळता पाटणा आणि रांची येथून आठवड्यातून सहा दिवस धावेल. बिहार आणि झारखंडप्रमाणेच गोव्यालाही पहिली ट्रेन मिळणार आहे. मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस गोव्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव स्थानकादरम्यान चालवली जाईल.

    कर्नाटकला दुसरी वंदे भारत ट्रेन भेट

    भारतीय रेल्वे कर्नाटकला दुसरी वंदे भारत ट्रेन भेट देणार आहे. चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन येथे आधीच धावत आहे. आता रेल्वे धारवाड-बंगळुरू मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवणार आहे. ही ट्रेन धारवाड, हुब्बल्ली आणि दावणगेरेला राजधानी बेंगळुरूशी जोडण्यासाठी काम करेल. बंगळुरू हे एक प्रकारे टेक हब आहे. येथे विद्यार्थी आणि व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत येथे धावणाऱ्या ट्रेनचा फायदा सर्वसामान्यांसोबतच व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनाही होणार आहे. दरम्यान, देशात एकूण 18 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

    Nation will get gift of 5 Vande Bharat trains, PM Modi will show green flag in Bhopal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!