विशेष प्रतिनिधी
नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींना ज्या पद्धतीने बॉम्बने उडवून दिले तसेच राहुल गांधींना उडवून देण्याची धमकी देणारा व्यक्ती नाशिक मधला मनोरुग्ण निघाला. पण सरकारने कोणतीही रिस्क न घेता राहुल गांधी यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली.Nashik turns out to have threatened to blow up Rahul Gandhi with a bomb, but the government has increased security!!
राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन नाशिकच्या पोलीस मुख्यालयात आला होता त्यामुळे महाराष्ट्र सह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. पोलीस यंत्रणा तसेच केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या. फोन करणाऱ्याची पाळेमुळे शोधायला सुरुवात झाली आणि तो नाशिकमध्ये गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतला एक मद्यपी मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्याने राहुल गांधींना राजीव गांधीं सारखेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन केल्याचेही पोलीस तपासात उघड झाले. नाशिक पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली.
पण दरम्यानच्या काळात केंद्रीय गृह मंत्रालयाची देखील यंत्रणा कार्यान्वित झाली. राहुल गांधींभोवतीचे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानादेखील भोवती देखील सुरक्षा व्यवस्था वाढवली. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशात आहेत. तेथे देखील अलर्ट देण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने देखील राहुल गांधी यांच्या भोवतीची राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था वाढवली.