• Download App
    Narendra Modi सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!

    सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!

    नाशिक : सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!, असे चित्र आज दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा संसदेत असणाऱ्या जी एम सी बालयोगी सभागृहात आज सुरू झाली. या कार्यशाळेत सत्ताधारी NDA खासदारांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान कसे करावे. त्यासाठीची आवश्यक ते कायदेशीर प्रक्रिया काय आहे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य महत्त्वाच्या बाबींची चर्चा देखील करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत वेगवेगळी सत्रे होणार आहेत. Narendra Modi

    मोदी सरकारने नुकतेच GST Reforms करून सर्वांना दिलासा दिला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष अभिनंदनाचा ठराव या कार्यशाळेत मंजूर करण्यात आला.

    पण यापेक्षा वेगळी आणि मोठी चर्चा एका वेगळ्याच विषयाची झाली. कारण या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या एका सर्वसाधारण खासदाराच्या रुपात सहभागी झाले. ते अन्य खासदारांच्या बरोबरीने सगळ्यात शेवटच्या रांगेत बसले. तिथूनच त्यांनी कार्यशाळेच्या सत्रांमध्ये भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या बरोबर शेवटच्या रांगेत बसलेत हे पाहून अनेक खासदारांना सुखद धक्का बसला.

    एरवी जीएमसी बालयोगी सभागृहात होणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थातच पहिल्या रांगेत बसलेले दिसतात. पण आजच्या कार्यशाळेत मात्र त्यांनी स्वतःहून शेवटच्या रांगेत बसणे पसंत केले. त्यांनी स्वतः या सगळ्या प्रकारचा कुठलाही गाजावाजा केला नाही. पण भाजपच्या अनेक खासदारांनी त्या बैठकीचे फोटो आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करून मोदींच्या साधेपणाचे कौतुक केले. किशन कुमार, डॉ. संगीता बलवंत यांच्या x हँडल वरचे फोटो घेऊन प्रसार माध्यमांनी मोदींच्या साधेपणाच्या बातम्या केल्या. त्यात कुठलेही मान – अपमान पेरले नाहीत.

    – ठाकरे + पवार शेवटच्या रांगेत

    मध्यंतरी राहुल गांधींनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मतदान चोरी बद्दल प्रेझेंटेशन सादर केले होते त्या प्रेझेंटेशन मुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना शेवटचा रांगेत बसविले, म्हणून म्हणून त्यांच्या पक्षांनी आणि मराठी माध्यमांनी मोठा राजकीय गदारोळ घातला होता. राहुल गांधींच्या घरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे शेवटच्या रांगेत कसे काय स्थान असू शकते??, असा सवाल केला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फार मोठा अवमान झाल्याचा आव आणला होता.

    या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा साधेपणा ठळक पणाने नजरेत भरणारा होता. पण त्याविषयी मराठी माध्यमांनी फारसे भाष्य केलेले दिसले नाही.

    Narendra Modi sitting in the last row in the workshop of NDA MPs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi : मोदी व्हर्च्युअल BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, जयशंकर सहभागी होणार

    भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??

    Salman Khan : सलमान खान पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला, बचाव कार्यासाठी 5 बोटी पाठवल्या, गावेही दत्तक घेणार