• Download App
    कॅरेबियन देशांतील हजारो लोकांचे प्राण नरेंद्र मोदी यांनी वाचविले, अ‍ँटिगुआच्या पंतप्रधानांनी लस पुरविल्याबद्दल मानले आभार|Narendra Modi saves thousands of Caribbean lives, thanks Antigua PM for vaccination

    कॅरेबियन देशांतील हजारो लोकांचे प्राण नरेंद्र मोदी यांनी वाचविले, अ‍ँटिगुआच्या पंतप्रधानांनी लस पुरविल्याबद्दल मानले आभार

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅरेबियन देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविल्याने हजारो लोकांचे जीव वाचले आहेत. यासाठी अ‍ँटिगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.Narendra Modi saves thousands of Caribbean lives, thanks Antigua PM for vaccination


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅरेबियन देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविल्याने हजारो लोकांचे जीव वाचले आहेत. यासाठी अ‍ँटिगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

    गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यानंतर भारतातमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या घटली होती. यावेळी भारतामध्ये अनेक जण कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास तयार नव्हते. मोठ्या प्रमाणावर लस शिल्लक होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हॅक्सिन मैत्री हा उपक्रम राबविला.



    त्यानुसार जगातील गरीब देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये कॅरेबीयन देशांतील अ‍ॅँटिगुआ आणि बारबुडाचा समावेश होता.याबाबत ब्राऊनी म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लस देऊन आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत.

    आमच्या देशांतील हजारो लोकांचे प्राण त्यामुळे वाचले आहेत. भारतीय लसीप्रति आम्ही कृतज्ञ आहोत.भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे देशापुढे कठीण समस्या निर्माण झाली आहे.

    भारताबाबत आपल्याला पूर्णपणे सहानुभूती वाटत असल्याचेही ब्राऊनी म्हणाले. भारतासमोर त्यांचे स्वत:चे खूप प्रश्न होते. तरीही भारताने पुढचे पाऊल टाकले. त्यामुळे आमच्या देशातील प्रत्येक देशवासी भारतीयांसाठी प्रार्थना करत आहे.

    Narendra Modi saves thousands of Caribbean lives, thanks Antigua PM for vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले