विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घ्यावी यासाठी डोळे लावून बसलेल्या विरोधकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वेगळ्या प्रकारे चपराक हाणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी हेच भविष्यकाळात पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे जाहीर करून टाकले. Narendra Modi
अष्टक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने 2019 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील का??, असा सवाल केला. त्यावर राजनाथ सिंह म्हणाले, तुमचा हा सवालच चुकीचा आहे. 2019 मध्ये तर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतीलच पण त्यानंतर होणाऱ्या 2034 आणि 2039 या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. कारण त्यांच्या करिष्माई नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर भारताची उंची वाढली. भारत काय म्हणतोय हे कान उघडून जग ऐकायला लागले. नरेंद्र मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे भारताची शान जगात वाढली.
राजनाथ सिंह यांच्या या मुलाखतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंटची वाट बघणाऱ्या विरोधकांना आणखी मोठा धक्का बसला. नरेंद्र मोदींना आपण निवडणुकीत पराभूत करू शकत नाही त्यामुळे त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घ्यावी, याकडे काँग्रेस सकट सगळी विरोधक डोळा लावून बसले होते. त्यासाठी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याचा आधारही घेतला होता. एकदा अंगावर 75 ची शाल पांघरली की माणसाने रिटायर व्हावे, असे इतर लोक तर सांगतात, असे मोहन भागवत हे मोरोपंत पिंगळे यांचा हवाला देऊन म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांच्या सकट विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी मोदींना 75 वयाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रिटायरमेंटच्या मुद्द्यावरून डिवचले होते.
परंतु राजनाथ सिंह यांनी 2029, 2034 आणि 2039 या पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे सांगून विरोधकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले.
Narendra Modi is the candidate for the post of Prime Minister in 2029, 2034, 2039
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका, आरोप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच उघडे
- सहा वर्षांत एकही निवडणूक नाही! 474 पक्षांचा ‘गेम ओव्हर’
- सध्या भारतात “दुबळे” पंतप्रधान; तर मग यासीन मलिकला हाफिज सईदच्या भेटीला पाकिस्तानात पाठवणारे पंतप्रधान “बळकट” होते का??
- BAPS organization : अमेरिकेतील BAPS संस्थेविरुद्धचा तपास बंद; न्यू जर्सी मंदिर प्रशासनावर कामगारांचे शोषण- मानवी तस्करीचा होता आरोप