• Download App
    Narendra Modi मोदींच्या गणपती पुजनावर काँग्रेस इकोसिस्टीम भडकली; ओरिसातून धुलाई करून मोदींनी कसर भरून काढली!!

    Narendra Modi : मोदींच्या गणपती पुजनावर काँग्रेस इकोसिस्टीम भडकली; ओरिसातून धुलाई करून मोदींनी कसर भरून काढली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Narendra Modi सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपती पूजा आणि आरती केली. त्यामुळे काँग्रेसची सगळी इकोसिस्टीम भडकली त्या इकोसिस्टीमने मोदींवर आगपाखड केली. यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत्वाने आघाडीवर होती. दोन्ही पक्षांच्या न्यायालयीन निर्णयात मोदी आणि सरन्यायाधीश भेटीचा फरक पडेल, असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला. त्यामध्ये काँग्रेसी प्रवृत्तीच्या घटना तज्ञांनी भर घातली. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांकडे जाणे हे राज्यघटनेच्या तत्त्वात बसत असल्याचा “जावईशोध” घटना तज्ञांनी लावला. Narendra Modi

    आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी ओरिसातल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या सगळ्या टीकेची कसर भरून काढली. काँग्रेसच्या इकोसिस्टीमची त्यांनी पुरती धुलाई केली. भारतावर कब्जा करून बसलेल्या इंग्रजांना देखील लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रित्या सुरू केलेला गणेशोत्सव फुटीरतावादी नजरेत खटकत होता. कारण त्यामुळे देश आपल्या सगळ्या उणीवा बाजूला करून एकवटला होता. या एकजुटीनेच इंग्रजांविरुद्धचा मुकाबला मजबूत झाला. आज फोडा आणि झोडा अशी इंग्रजांची फुटीरतावादी नीती पुढे नेणाऱ्या काँग्रेसी इकोसिस्टीमला देखील गणेशोत्सव नजरेत खटकतोच आहे म्हणूनच मोदींनी केलेली गणपती पूजा काँग्रेसी इकोसिस्टीमला खटकली, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी धुलाई केली. Narendra Modi

    त्याचवेळी त्यांनी कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारला देखील झोडपून काढले. मंड्या जिल्ह्यात समाजकंटकांनी गणपती मांडवावर दगडफेक केल्यानंतर कर्नाटकच्या राज्य सरकारने समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी गणपतीची मूर्ती पोलिसांच्या व्हॅन मध्ये घातली. गणपतीलाच त्यांनी कोठडीत डांबले, असे शरसंधान मोदींनी साधले.

     

    Narendra  Modi Ganesh Poojan said

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य