• Download App
    नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत कणकवलीत जन आशीर्वाद यात्रा जल्लोषात|Narayan Rane Welcomed in home town Kankavali

    WATCH :नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत कणकवलीत जन आशीर्वाद यात्रा जल्लोषात

    विशेष प्रतिनिधी

    कणकवली : नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात, ढोल आणि ताशाच्या गजरात स्वागत केले गेले.नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी यात्रेचे स्वागत केले. सिंधुगर्जना ढोल पथकाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.Narayan Rane Welcomed in home town Kankavali

    यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, नीलम ताई राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,यात्रा प्रमुख प्रमोद जठार आदी उपस्थित होते.



    कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह…

    कणकवलीत मंत्री राणे येणार असल्याने शुक्रवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.मोठ्या संख्येने गर्दी त्यात ढोल पथकाची साथ ,आनंदाने कार्यकर्त्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता.भारतीय जनता पक्षाचे झेंडे कार्यकर्ते अमाप उत्साहात फिरवत होते. हा उत्साह रात्री उशिरापर्यंत तसाच होता.अखेर केंद्रीय मंत्री राणेंचे आगमन झाले आहे.

    •  सिंधुगर्जना ढोल पथकाचा लक्षवेधी अविष्कार
    • ढोल आणि ताशाच्या गजरात स्वागत
    • पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी गर्दी
    • नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
    • ढोलाच्या तालावर कार्यकर्त्यांचा ठेका
    • भारतीय जनता पक्षाचे झेंडे फडकले
    • कार्यकर्त्यांचा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम

    Narayan Rane Welcomed in home town Kankavali

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे