• Download App
    दिशा सॅलियनची सामुदायिक बलात्कार करून हत्याच, नारायण राणे यांचा दावा|Narayan Rane claims that Disha Salian was gang-raped and murdered

    दिशा सॅलियनची सामुदायिक बलात्कार करून हत्याच, नारायण राणे यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिची सामुदायिक बलात्कार करून हत्याच करण्यात आली आहे. सुशांतसिंग राजपूतसह या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.Narayan Rane claims that Disha Salian was gang-raped and murdered

    नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार?



    यापूर्वीही नारायण राणे यांनी दिशा सॅलियनला इमारतीतून खाली फेकून देण्यात आल्याचा दावा केला. होता. ते म्हणाले होते की, सुशांत सिंगची त्याच्याच बाथरुममध्ये हत्या झाल्याचे पुरावे मी दिले. या हत्येत सहभागी असणाऱ्यांची नावंही मी दिली.

    पण मुख्यमंत्र्यांचा मुलगाच सहभागी असल्याने कोणतीही अटकेची कारवाई झाली नाही. दिशा सॅलियन प्रकरणातही कोणती अटक झाली नाही.राणे म्हणाले होते की, दिशा सॅलियनची हत्या करण्यात आली. सुशांत तिचा मित्र होता. त्याने तिच्या हत्येची माहिती लपवण्यास नकार दिला म्हणूनच त्याचीही हत्या करण्यात आली.

    Narayan Rane claims that Disha Salian was gang-raped and murdered

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी