वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘भारतात कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. म्हणून तरुणांनी दर आठवड्याला ७० तास (म्हणजे ६ दिवस रोज १२ तास) कामासाठी सज्ज असले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, जर्मनीने असे करून शिखर गाठले आहे…’ इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी पॉडकॉस्ट ‘द रेकॉर्ड’मध्ये असे म्हटले. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पई यांच्याशी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, वाचा…Narayan Murthy said – Work productivity in India is the lowest in the world; Youth must work 70 hours a week
आपली कार्यसंस्कृती अत्यंत शिस्तप्रिय, जिद्द अन् कठोर परिश्रमांची बनवावी लागेल
जोपर्यंत आपण उत्पादकतेत सुधारणा करत नाही, जोपर्यंत एका पातळीवर सरकारमधील भ्रष्टाचार कमी करत नाही, जोपर्यंत निर्णय घेण्यात नोकरशाही कमी उशीर करेल तोपर्यंत आपण त्या देशांसोबत स्पर्धा करू शकणार नाही ज्यांनी उत्तम प्रगती केली आहे. म्हणून भारतातील तरुणांनी पुढे येऊन म्हटले पाहिजे की, ‘हा माझा देश आहे. मी आठवड्यातील ७० तास काम करू इच्छित आहे.”
कठोर परिश्रमांचा पर्याय : जशी देशाची संस्कृती तशीच सरकारे असतात. म्हणून ‘आपल्या संस्कृतीचे अधिक जिद्द, शिस्तप्रिय आणि कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांमध्ये रूपांतर करावे लागेल. जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत कोणतेही सरकार काहीच करू शकत नाही. बदलाची सुरुवात तरुणांपासून व्हायला हवी.
जगात स्वत:ला सिद्ध करण्याची एकमेव पद्धत कामगिरी आहे. कामगिरीने ओळख मिळते, मान्यता आदराकडे घेऊन जाते व आदर शक्तीकडे घेऊन जातो. चीन याचे मोठे उदाहरण आहे. आगामी २० ते ५० वर्षांपर्यंत आपल्याला अशीच शिस्तप्रिय कार्यसंस्कृती विकसित करावी लागेल. जेणेकरून भारत जीडीपीच्या बाबतीत अव्वल ठरेल. मागील ३०० वर्षांत प्रथमच भारताला राष्ट्रांचा एक समूह म्हणून आदर मिळाला. तो बळकट करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे.
तंत्रज्ञानाने उत्तम शिक्षण मिळत आहे. आपण आधीच्या तुलनेत वेगाने प्रगती करत आहोत. ऑनलाइन सामान कसे मागवायचे हे माझ्या स्वयंपाक्यालाही माहीत आहे. तंत्रज्ञानाचा मोठा फायदा म्हणजे यामुळे आत्मविश्वास वाढतो.’
Narayan Murthy said – Work productivity in India is the lowest in the world; Youth must work 70 hours a week
महत्वाच्या बातम्या
- थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम
- टाटा समूह भारतात आयफोन बनवणार; टाटाचा विस्ट्रॉनशी 1,000 कोटी रुपयांचा करार, 2.5 वर्षांत सुरू होईल उत्पादन
- काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?’, भाजपाचा थेट सवाल!
- केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ”सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी घट , मात्र…”