विशेष प्रतिनिधी
मुंबई :Nana + Raut महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वाद झाल्यानंतर जागा वाटपाच्या बैठकीत नाना पटोले नकोत अशी ताठर भूमिका काल घेणाऱ्या शिवसेनेची आज भूमिका बदलली नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे ते बैठकीत असतील, असा खुलासा संजय राऊत यांनी केला, पण तत्पूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला मातोश्रीवर जाऊन आले. त्यामुळे फक्त चेन्निथलांना मातोश्रीवर आणण्यासाठी शिवसेनेने सगळी राजकीय मशक्कत केली का??, असा सवाल तयार झाला.Nana + Raut
कुठल्या युती किंवा आघाडीचे जागावाटप हे मातोश्रीवर अंतिम करायचे, ही बाळासाहेब ठाकरे यांची “राजकीय सवय” होती. प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेते बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर येत असत. शिवसेना – भाजप युतीची सगळी चर्चा मातोश्री भोवतीच केंद्रित असायची. बाळासाहेब क्वचितच मातोश्री बाहेर कोणाच्या भेटीला गेले.
पण उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाल्यानंतर परिस्थिती बदलली. 2019 मध्ये अमित शाह मातोश्रीवर गेले होते, पण नंतरचे सगळे राजकारण पूर्णपणे फिरल्यानंतर शरद पवार वगळता क्वचितच दुसरे कुठले नेते मातोश्रीवर गेले. त्या उलट उद्धव ठाकरेच दिल्लीला जाऊन 10 जनपथ मध्ये सोनिया गांधींना भेटून आले. राजकीय दृष्ट्या मातोश्रीचे महत्व ओहटीला लागल्याचे ते चिन्ह होते.
महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या बैठका आता मातोश्रीवर होत नाहीत. त्या कुठल्यातरी ट्रायडेंट किंवा अन्य हॉटेलमध्ये होतात. काल अशीच बैठक ट्रायडेंट मध्ये झाली. त्यावेळी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद झाला. नाना पटोले त्यांना तिरकस बोलले. संजय राऊत यांनीही सांगली पॅटर्न करू अशी दमबाजी केली, नंतर त्यांनी नाना पटोले असतील, त्या बैठकीला शिवसेनेचे नेते जाणार नाहीत, असे सांगून टाकले. त्या बैठकीतल्या वादाच्या सगळ्या बातम्या बाहेर आल्या.
आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला झाला मातोश्रीवर गेले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नाना आणि राऊत यांच्यात “पॅचअप” झाले. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने ते जागावाटपाच्या बैठकीत असतील. शिवसेनेचे नेते देखील त्या बैठकीला उपस्थित राहतील, असा खुलासा नंतर संजय राऊत यांनी केला. त्यामुळे फक्त काँग्रेसचे प्रभारी मातोश्रीवर आणण्यासाठी जागावाटपाच्या वादाची राजकीय मशक्कत शिवसेनेने केली का??, असा सवाल तयार झाला.
Nana + Raut became “patchup”; Was the effort made only to bring the Congress in-charge to Matoshree??
महत्वाच्या बातम्या
- Tarun Chugh : फुकट आणि अनियंत्रित खर्चांमुळे पंजाब बरबाद झाला आहे – तरुण चुग
- Marathi Pali Prakrit : मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांच्या अभ्यासकांनी मोदी सरकारचे मानले आभार
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा झारखंड सरकारला 1 लाखांचा दंड; राज्य सरकार व PSUच्या निरुपयोगी याचिक; अधिकारी जबाबदार
- Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत बिघाडी; नाना पटोलेंसोबत चर्चा करण्यास उद्धव ठाकरे गटाचा नकार, काँग्रेसच्या वरिष्ठांशी करणार चर्चा