• Download App
    हिंदू पुर्नजागरणससाठीराजधानी दिल्लीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण करा, डॉ. सुब्रमण्याम स्वामी यांची मागणी|Name the capital Delhi as Indraprastha for Hindu renaissance, Dr. Demand of Subramanian Swamy

    हिंदू पुर्नजागरणसाठी राजधानी दिल्लीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण करा, डॉ. सुब्रमण्याम स्वामी यांची मागणी

    दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ करत नाही तोपर्यंत देशावरील संकटे संपणार नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ असे नामकरण करावे,अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.Name the capital Delhi as Indraprastha for Hindu renaissance, Dr. Demand of Subramanian Swamy


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ करत नाही तोपर्यंत देशावरील संकटे संपणार नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ असे नामकरण करावे,अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.

    डॉ. स्वामी यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, हिंदू पुर्नजागरणसाठी दिल्लीचे नामरकरण इंद्रप्रस्थ असे करणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले आहे की यासंदर्भात द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिश्र यांनी विशेष अभ्यासही केला आहे.



    तामीळनाडूतील एका महान संताने मला सांगितले होते की जोपर्यंत आपण राजधानी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ असे ठेवत नाही तोपर्यंत देशावर संकटे येत राहतील. ब्रिटिश आणि मोगल शासनातही दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थच होते.

    डॉ. नीरा मिश्र यांनी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ होते असे अनेक पुरावे शोधले आहेत. ते म्हणतात की, महाभारतात त्याचा उल्लेख आहेच पण १९११ मध्ये ब्रिटिश सरकारने काढलेल्या एका अधिसूचनेतही याचा पुरावा मिळाला आहे.

    आपण गेल्या अठरा वर्षांपासून यावर अभ्यास करत आहोत. भारतीय पुरातत्व विभागाच्या अनेक दस्ताऐवजात दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ आहे.इंद्रप्रस्थ नाव पुसून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

    १९११ मध्ये ब्रिटिश सरकारने काढलेल्या अधिसूचनेत इंद्रप्रस्थ किल्ला संरक्षित विभाग केला होता. हे सगळे पुरावे पाहता दिल्लीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण करण्यास कोणतीही हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

    Name the capital Delhi as Indraprastha for Hindu renaissance, Dr. Demand of Subramanian Swamy

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’