• Download App
    एन. टी. रामाराव यांचे पुत्र नंदामुरी बालकृष्ण यांची मुक्ताफळे, भारतरत्नाला माझ्या वडलांच्या नखाचीही सर नाही, ए. आर. रेहमान कोण ओळखत नाही|N. T. Rama Rao's son Nandamuri Balakrishna's said Bharat Ratna does not even have my father's nails, doesn't know who A. R. Rehman

    एन. टी. रामाराव यांचे पुत्र नंदामुरी बालकृष्ण यांची मुक्ताफळे, भारतरत्नाला माझ्या वडलांच्या नखाचीही सर नाही, ए. आर. रेहमान कोण ओळखत नाही

    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : तेलगू देशम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचे पुत्र आणि चित्रपट निर्माते नंदामुरी बालकृष्ण यांनी भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराबद्दल मुक्ताफळे उधळली आहेत.N. T. Rama Rao’s son Nandamuri Balakrishna’s said Bharat Ratna does not even have my father’s nails, doesn’t know who A. R. Rehman

    एन. टी. रामाराव यांच्या नखाचीही सर भारतरत्न पुरस्काराला नसल्याचे बरळतानाच संगीतकार ए. आर. रेहमान कोण, त्याला मी ओळख नाही असे त्यांनी म्हटले आहे.



    एका तेलगू चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नंदामुरी म्हणाले, ए. आर. रेहमान कोण? त्याला मी ओळख नाही. दशकातून एकदा तो काम करतो आणि ऑस्कर पुरस्कार मिळवितो. त्याला माझ्या लेखी काडीचीही किंमत नाही.

    केवळ ऑस्करच नाही तर भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मानत नाही. हा प्रतिष्ठित पुरस्कार माझे दिवंगत वडील एनटी रामराव यांच्यासाठी योग्य नव्हता. त्याला त्यांच्या नखाचीही सर नाही. तेलगू चित्रपटात माझ्या कुटुंबाच्या योगदानाची भरपाई कोणताही पुरस्कार करू शकत नाही.

    हॉलीवूडचा दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनपेक्षा आपण मोठे आहोत असे सांगत नंदामुरी म्हणाले, कॅमेरॉन यांना एक चित्रपट करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मी ज्या पध्दतीने काम करतो त्यामुळे कमी वेळात जास्त हिट चित्रपट तयार होतात.

    नंदमुरी बाळकृष्ण यांची वाद घालण्याची ही पहिली वेळ नाही. एका चाहत्याला त्याने थप्पडही लगावली होती. ए. आर. रेहमान याला ओळखत नसल्याचे ते म्हणत असतील तरी १९९३ मध्ये रेहमान यांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले होते.

    N. T. Rama Rao’s son Nandamuri Balakrishna’s said Bharat Ratna does not even have my father’s nails, doesn’t know who A. R. Rehman

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य