• Download App
    शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीचा 7 सभांचा प्लॅन; पण सभांमध्ये अंतरच फार!!|MVA to hold Rallies in 7 cities of maharashtra, but kept the distance of dates too far!!

    शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीचा 7 सभांचा प्लॅन; पण सभांमध्ये अंतरच फार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला राजकीय उभारी देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत, पण त्या प्रयत्नांना जोड देण्याची गरज निर्माण झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यासाठी पुढे सरसावले आहेत.MVA to hold Rallies in 7 cities of maharashtra, but kept the distance of dates too far!!

    शिंदे – फडणवीस सरकार समोर मोठे आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीने सर्व नेत्यांच्या एकत्रित सभांचा धडाका लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा धडाका लावत असताना ज्या 7 सभांचे प्लॅनिंग महाविकास आघाडीने केले आहे, त्या सभांमध्ये अंतरच फार ठेवले आहे.



    महाराष्ट्रातील 7 शहरांमध्ये 2 एप्रिल ते 11 जून अशा 3 महिन्यांमध्ये 7 सभा होणार आहेत. त्यामुळे या सभांचा राजकीय इम्पॅक्ट कसा पडेल??, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    सध्याच्या राजकारणाचा वेग पाहता कोणत्याही जाहीर सभांपेक्षा सोशल मीडिया कॅम्पेन जास्त चालते. या कॅम्पेन मध्ये भाजप आणि शिंदे गट जास्त आघाडीवर असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आदी नेते एकत्रित सभा घेणार आहेत. पण या सभांमधले दिवसांचे अंतर अधिक असल्यामुळे त्याच्या इम्पॅक्ट विषयी शंका निर्माण होत आहे.

    उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडीच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे स्वतंत्र सभांचे कॅम्पेन पुढे सुरू राहणारच आहे. पण त्यात आता या 7 सभांची भर घालून ते महाविकास आघाडीचे कॅम्पेन असल्याचे दाखविले जाणार आहे.

    महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला सभा होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, अंबादास दानवे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि नागपूर अशा 7 शहरांत जाहीर सभा होणार आहेत.

    2 एप्रिलपासून 11 जून पर्यंत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काय बोलणार??, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     सभांचे नियोजन असे :

    2 एप्रिल : छत्रपती संभाजीनगर

    16 एप्रिल : नागपूर

    1 मे : मुंबई

    14 मे : पुणे

    28 मे : कोल्हापूर

    3 जुन : नाशिक

    11 जुन : अमरावती

    MVA to hold Rallies in 7 cities of maharashtra, but kept the distance of dates too far!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य