विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल पुढे गेले आहेत पण ते 21 डिसेंबर च्या पुढे ढकलू नका ते निकाल 21 डिसेंबरलाच लावा आणि त्यापुढे जाऊन सर्व स्थानिक निवडणुका 31 जानेवारीपर्यंतच घ्या, अशा स्पष्ट शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाला फटकारले. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालात खोडा घालणाऱ्या राजकीय नेत्यांचे सुद्धा अवसान गळाले.
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्यानंतर त्याला आधी हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने ते निकाल 21 डिसेंबर रोजी लावायला मंजुरी दिली होती. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज याचिकाकर्त्यांना फटकारले. पण त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने आपल्या जुन्या निकालाची आठवण करून देऊन निवडणूक आयोगाला देखील कानपिचक्या दिल्या.
नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल पुढे गेलेच आहेत पण ते आणखी पुढे ढकलू नका ते 21 डिसेंबरलाच लावा त्याचबरोबर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आतच घ्या, अशा स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालात आणि निवडणुकांमध्ये न अडकता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची तयारी सुरू करणे भाग आहे.
Municipal elections results to be declared on December 21st Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- पुतिन भारतात पोहोचताच पंतप्रधान मोदींनी घेतली गळाभेट; विमानतळाव स्वागत, दोन्ही नेते एकाच गाडीत बसले
- Trump : ट्रम्प यांनी 19 देशांतील लोकांची नागरिकत्व प्रक्रिया थांबवली; ग्रीन कार्डही मिळणार नाही
- India Russia, : भारत-रशिया एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकतील, संरक्षण कराराला रशियन संसदेची मंजुरी
- पुतिन यांच्या बहुचर्चित दौऱ्यातून भारताची अपेक्षा काय??, मिळणार काय??