• Download App
    मोठी बातमी : मुंद्रा बंदरातील ड्रग्ज जप्तीप्रकरणी एनसीआरमध्ये NIAचे 5 ठिकाणी छापे । Mundra port drugs seizure case NIA raids 5 locations in NCR

    मोठी बातमी : मुंद्रा बंदरातील ड्रग्ज जप्तीप्रकरणी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये NIAचे 5 ठिकाणी छापे

    Mundra port drugs seizure case : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात आज मोठी कारवाई केली आहे. एनआयएने यासंदर्भात आज राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. 6 ऑक्टोबर रोजी एनआयएने मुंद्रा बंदरातून 2,988 किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची चौकशी हाती घेतली होती. Mundra port drugs seizure case NIA raids 5 locations in NCR


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात आज मोठी कारवाई केली आहे. एनआयएने यासंदर्भात आज राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. 6 ऑक्टोबर रोजी एनआयएने मुंद्रा बंदरातून 2,988 किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची चौकशी हाती घेतली होती.

    इराणच्या अब्बास बंदरातून ड्रग्ज मुंद्रा बंदरात दाखल

    गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने माचावरम सुधाकरन, दुर्गा पीव्ही गोविंदाराजू, राजकुमार पी. आणि इतरांविरोधात आयपीसी, एनडीपीएस कायदा आणि बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली नोंदवलेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या नोंदणीनंतर त्याच्या जलद तपासासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हे ड्रग्ज इराणच्या अब्बास बंदरातून मुंद्रा बंदरात दाखल झाले होते.

    काय प्रकरण आहे?

    13 सप्टेंबर 2021 रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी मुंद्रा बंदरात टॅल्कम पावडरच्या नावाने आयात केलेली 2988.21 किलो हेरॉईन पकडले होते. त्याची बाजारातील किंमत 21000 कोटी रुपये आहे. मुंद्रा बंदराचे काम अदानी ग्रुपकडे आहे. या प्रकरणानंतर, अदानी समूहाने म्हटले होते की, डीआरआयसह केवळ सरकारी अधिकाऱ्यांना बेकायदेशीर मालाची तपासणी करण्याची आणि जप्त करण्याची परवानगी आहे, बंदर चालकांना नाही.

    Mundra port drugs seizure case NIA raids 5 locations in NCR

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती