• Download App
    Mumbai Drug Case : आर्यनच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी, शाहरुखने माजी अॅटर्नी जनरलसह दिग्गज वकिलांची फौज उतरवली|Mumbai Drug Case Former Attorney General Of India, Rohatgi And Veteran Lawyers Will Cross-Examine In Bombay High Court

    Mumbai Drug Case : आर्यनच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी, शाहरुखने माजी अॅटर्नी जनरलसह दिग्गज वकिलांची फौज उतरवली

    बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उतरवली आहे. विशेष म्हणजे आज भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हेदेखील शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद करताना दिसणार आहेत. मुकुल रोहतगी हे यापूर्वी गुजरात दंगलीत राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वकील होते. शाहरुखच्या मुलाला जामीन द्यावा, असे त्यांनी नुकतेच सांगितले.Mumbai Drug Case Former Attorney General Of India, Rohatgi And Veteran Lawyers Will Cross-Examine In Bombay High Court


    वृत्तसंस्था

    मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उतरवली आहे. विशेष म्हणजे आज भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हेदेखील शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद करताना दिसणार आहेत. मुकुल रोहतगी हे यापूर्वी गुजरात दंगलीत राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वकील होते. शाहरुखच्या मुलाला जामीन द्यावा, असे त्यांनी नुकतेच सांगितले.

    हे वकीलही करणार युक्तिवाद

    माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याव्यतिरिक्त, लॉ फर्म करंजावाला अँड कंपनीचे वकील आज मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत आर्यन खानच्या बाजूने उभे राहणार आहेत. याशिवाय रुबी सिंग आहुजा, संदीप कपूर, आनंदिनी फर्नांडिस, रुस्तम मुल्ला हे दिग्गज वकीलही आर्यनच्या वतीने युक्तिवाद करतील.

    सतीश मानेशिंदे आणि देसाई यांनीही लढला होता खटला

    आर्यन खान खटल्याच्या सुनावणीत आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी युक्तिवाद केला होता, परंतु आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात दोन्ही वकील अपयशी ठरले. शाहरुख खानने सर्वप्रथम आर्यन खानला जामीन मिळवून देण्याची जबाबदारी वकील सतीश मानेशिंदे यांच्यावर सोपवली. सतीशने यापूर्वी रिया चक्रवर्तीची केस लढवली होती. यानंतर शाहरुख खानने आर्यन खान यांच्या वतीने वकील अमित देसाई यांना न्यायालयात उभे केले.

    अमित देसाई यांनी कुप्रसिद्ध हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती, पण तेही आर्यन खानला जामीन मिळवून देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत आर्यन खानसाठी यावेळी शाहरुखने वकिलांची संपूर्ण फौज उतरवली असून त्यात देशातील दिग्गज वकिलांचा समावेश आहे.

    Mumbai Drug Case Former Attorney General Of India, Rohatgi And Veteran Lawyers Will Cross-Examine In Bombay High Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!