• Download App
    मुलायम सिंह यादव यांनी देखील INDIA ऐवजी केले होते भारत शब्दाचे समर्थन; जाणून घ्या काय म्हणाले होते? Mulayam Singh Yadav also supported the word Bharat instead of INDIA

    मुलायम सिंह यादव यांनी देखील INDIA ऐवजी केले होते भारत शब्दाचे समर्थन; जाणून घ्या काय म्हणाले होते?

    सुमारे 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना…

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडी केली आहे, ज्याचे नाव I.N.D.I.A. ठेवले आहे. त्याचवेळी, नुकत्याच झालेल्या G20 परिषदेनिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रणात ‘President of India’ ऐवजी ‘President of BHARAT’ असे लिहिण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून यावर आक्षेप नोंदवला गेला आहे.  मात्र असे घडण्याची  ही काही पहिली वेळ नाही या अगोदरही अनेकदा असा प्रयत्न झालेला आहे. Mulayam Singh Yadav also supported the word Bharat instead of INDIA

    खरंतर आज आपण समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांच्याबद्दल बोलत आहोत. सुमारे 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेत इंडिया नाव बदलण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव आणला आणि तो एकमताने मंजूर करून घेतला.

    भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 च्या कलम 1 नेम एण्ड टेरीटोरी आफ यूनियन) मधील “इंडिया इज भारत” च्या जागी “भारत इज इंडिया ” करण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव सभागृहाच्या कामकाजात म्हणाले होते की, ‘मला सांगायचे आहे की राज्यघटनेत “इंडिया दॅट इज भारत” लिहिलेले असेल तेथे“भारत दॅट इज इंडिया आहे”असे लिहिले पाहिजे, पण आजपर्यंत ते त्यासाठी तयार नाहीत.

    मी संसदीय कामकाज मंत्र्यांना येथे प्रस्ताव आणण्यास सांगेन. विधानसभेत यावर चर्चा करून ती पास करून संसदेत पाठवायला काय हरकत आहे? माझा प्रस्ताव आहे की ‘ “इंडिया इज भारत” हे आता बदलले पाहिजे. उपसभापती महोदय, आपण असा प्रस्ताव मांडला पाहिजे की घटनादुरुस्ती करावी, जिथे राज्यघटनेत ““इंडिया इज भारत” ” लिहिलेले असेल, तिथे ‘भारत इज इंडिया’ असे लिहावे. परवानगी असल्यास, ते प्रस्तावित केले जाऊ शकते.

    Mulayam Singh Yadav also supported the word Bharat instead of INDIA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य