• Download App
    मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा ; न्यायालयाने आर्म्स ॲक्ट अंतर्गत दिला निकाल |Mukhtar Ansari sentenced to life imprisonment The court passed the verdict under the Arms Act

    मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा ; न्यायालयाने आर्म्स ॲक्ट अंतर्गत दिला निकाल

    वाराणसीच्या खासदार आमदार न्यायालयाने मुख्तार अन्सारीला ३६ वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवले


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगात बंद असलेल्या माफिया मुख्तार अन्सारीच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. कारण, बनावट शस्त्र परवाना प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाराणसीच्या खासदार आमदार न्यायालयाने मंगळवारी मुख्तार अन्सारीला 36 वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवले.Mukhtar Ansari sentenced to life imprisonment The court passed the verdict under the Arms Act



    मुख्तार अन्सारीविरुद्धचा हा आठवा खटला आहे. याआधी त्याला सात प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. त्यापैकी वाराणसीच्या खासदार-आमदार न्यायालयाने तीन शिक्षा सुनावल्या आहेत.

    मुख्तार अन्सारीला कलम 467/120B अन्वये जन्मठेप आणि 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर 420/120 मध्ये 7 वर्षे कारावास व 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. 1987 मध्ये गाझीपूरमध्ये बंदुकीचा परवाना मिळवताना जिल्हाधिकारी आणि एसपींच्या खोट्या सह्या करून परवाना जारी करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

    Mukhtar Ansari sentenced to life imprisonment The court passed the verdict under the Arms Act

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Airlines : सीटवर अतिरिक्त शुल्क न आकारण्यावर विमान कंपन्यांचा विरोध; म्हटले- विमान भाडे वाढवावे लागेल

    TMC Manifesto : ममतांची घोषणा- SC-ST महिलांना दरमहा ₹1700, इतरांना ₹1500 मिळणार, जाहीरनाम्यात पक्क्या घरांचे आश्वासन

    Air India : एअर इंडियाने दिल्लीहून कॅनडाला चुकीचे विमान पाठवले; 7 तासांनंतर चीनच्या हवाई हद्दीतून परतले