वृत्तसंस्था
वायनाड : गेली 10 वर्षे वाराणसीचे खासदार देशाचे पंतप्रधान होते, पण पुढची 20 वर्षे वायनाडचे खासदार देशाचे पंतप्रधान असतील, असा अजब दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला आहे.MP from Varanasi was PM of last 10 countries, but MP from Wayanad will be PM for next 20 years!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार असा नारा दिला आहे, पण “इंडिया” आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील??, याचे भाकीत करायला मात्र राहुल आणि प्रियंका गांधी घाबरत आहेत, पण त्यांचे समर्थक मात्र राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची आस लावून बसले आहेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य त्या अपेक्षेतूनच समोर आले आहे.
रेवंत रेड्डी यांनी आज वायनाडला भेट दिली. तिथे एका रोड शो मध्ये ते सामील झाले. त्या रोड शो मध्येच पत्रकारांशी बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून वाराणसीतून निवडून आलेले खासदार देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत, पण पुढच्या 20 वर्षांमध्ये वायनाड मधून निवडून येणारे खासदार पंतप्रधान असतील!!
मी खासदार असताना भाजपचे नेते जेव्हा आम्हाला सेंट्रल हॉलमध्ये भेटायचे, तेव्हा ते म्हणायचे की पीएम मोदी आणि EVM ईव्हीएम आहे, तो पर्यंत तुमचा काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊ शकणार नाही. याचा अर्थ EVM द्वारे निवडणुका झाल्या, तरच भाजपला बहुमत मिळते. सगळ्या जगात बॅलेट पेपरवर निवडणूक चालते कुठल्याच देशात मशीनवर निवडणूक चालत नाही पण भाजपला बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची भीती वाटते. फक्त भाजपचा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा EVM विश्वास आहे, पण भारतीय नागरिकांचा मात्र त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे, अशी मखलाशी देखील रेवंत रेड्डी यांनी केली.
MP from Varanasi was PM of last 10 countries, but MP from Wayanad will be PM for next 20 years!!
महत्वाच्या बातम्या
- VVPAT प्रकरणात प्रशांत भूषण म्हणाले- स्लिप बॉक्समध्ये टाकली जावी, जर्मनीत हेच होते; सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात 97 कोटी मतदार
- आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांनी केले PM मोदींचे कौतुक, काँग्रेसचा तिळपापड; पदावरून दूर करण्याची मागणी
- RBI Guidelines: ग्राहकाला संपूर्ण माहिती दिल्यानंतरच कर्ज द्या, काही लपविल्यास कारवाई जाणार!
- डेली हंट सर्वेक्षण, 77 लाख सँपल साईज; नरेंद मोदींचा स्कोअर 64 %, राहुल गांधींचा 21.8 %…!!