शेतकरी आंदोलनाशी संबंधित गाजलेले टूलकीट प्रकरण
केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक
ऑक्टोबर २०२० मध्ये ट्विटरने लेहचा भाग चीनमध्ये दाखवला MONSTER-Twitter: Unforgivable crime repeated; Jammu and Kashmir and Ladakh excluded from India’s map; The Indians erupted
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ट्विटरने पुन्हा एकदा आपला भारत द्वेष दाखवला आहे .वारंवार ट्विटर भारताविरोधी भूमिका घेत आहे तरीही अद्याप ट्विटरला बॅन का करण्यात आले नाही हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला जात आहे .सोशल मीडिया साईट ट्विटर ने भारताच्या सार्वभौमत्वाशी पुन्हा एकदा छेडछाड केली आहे. भारताच्या नकाशातून जम्म-काश्मीर आणि लडाखला वगळून ट्विटरने हा नकाशा आपल्या साइटवर टाकला. इतकच नव्हे तर दोन केंद्रशासित प्रदेशांनाही ट्विटरने आपल्या नकाशात वेगळा देश म्हणून दाखवलं. MONSTER-Twitter: Unforgivable crime repeated; Jammu and Kashmir and Ladakh excluded from India’s map; The Indians erupted
भारत सरकारने बजावली नोटीस
या नकाशाप्रकरणी केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस बजावली असून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही ट्विटरविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर रात्रभर याविरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या. ज्यानंतर रात्री उशीरा ट्विटरने हा वादग्रस्त नकाशा हटवला. ३ दिवसांपूर्वी ट्विटरने केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट काही तासांसाठी ब्लॉक केलं होतं. केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातला संघर्ष गेल्या काही दिवसांमध्ये प्रामुख्याने पुढे आला आहे.
नवी दिल्ली शेतकरी आंदोलनाशी संबंधित गाजलेल्या टुलकीट प्रकरणात केंद्र सरकारने ट्विटरवर कारवाई केली होती. यानंतर आपल्या नवीन सोशल मीडिया पॉलिसीअंतर्गत सरकारने ट्विटरला अल्टीमेटम दिला होता.
याआधीही ट्विटरने भारताच्या नकाशात फेरफार केला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये ट्विटरने लेहचा भाग चीनमध्ये दाखवला होता. यानंतर केंद्र सरकारने ट्विटरचे सीईओ जेक डोरसे यांना तंबी दिली होती. यानंतर पुन्हा एकदा ट्विटरने ही कुरापत केली आहे.